Manoj Jarange Patil : मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मराठा समाजाच्या पूर्णवेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं आहे. मराठा समाजाच्या सुखदुःखाकडे लक्ष देणे उपस समितीचे काम आहे. मात्र, उप समितीचे नेमकं काम काय कळत नाही? सातारा समितीचा अहवाल घ्यायचा कधी? असा सवाल जरांगेंनी केला. मराठवाड्यात मराठा समाजाची एक बैठक लावायला विखे पाटलांकडे वेळ नाही, उपद्रवी विदूषक लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे, असा खोचक टोला देखील त्यांनी विखेंना लगावला. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा असे म्हणत अध्यक्षपदावरुन विखे पाटलांनी नाव घालवल्याचे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरुन विखे पाटलांवर टीका
मराठा आरक्षण उप समितीच्या कामावरून मनोज जरांगे पाटील नाराज आहेत. सातारा गॅझेटला आठ महिने उलटून गेले आणखी किती दिवस वाट पाहायची? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा अशी थेट मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरुन विखे पाटील नाव करतील असं वाटत होतं मात्र त्यांनी नाव घालवलं, असा थेट हल्लाबोल जरांगे पाटील यांनी चढवला. मराठा समाजाच्या हक्क आणि प्रश्नासाठी स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणारा अस जरांगे पाटील म्हणाले. उपसमितीने मराठा समाजाच्या सुखदुःखाकडे लक्ष द्यायचं असतं मात्र त्या साठी त्यांच्याकडे वेळ नाही विदूषकी लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे.
सातारा गॅजेट साठी आठ महिने उलटून गेले आणखी किती दिवस वाट पाहायची असा सवाल करत जरांगे पाटील यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. मराठा समाजाच्या प्रश्नांकडे उपसमिती दुर्लक्ष करत असल्याचाही त्यांनी आरोप केला. धाराशिव येथे भीम जयंती कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य केले. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न व्हायची असतील तर शेतीतून उत्पन्न निघण्याची गरज
शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न व्हायची असतील तर शेतीतून उत्पन्न निघण्याची गरज आहे. त्यासाठी पाणी गरजेचं आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरत आहेत. पोरांनींही कष्ट करण्याची गरज आहे, उद्योगधंद्याकडे वळायला हवं असे जरांगे म्हणाले. घरात खायला नाही तर कोण पोरगी देणार तुम्ही कष्ट करा, उद्योग धंद्याकडे वळा. आळशी पणा सोडला पाहिजे कष्ट करायला हवं शेतीतून खूप पैसा आहे असे जरांगे म्हणाले. काम करायचं नसेल तर लग्नाचं काय सांगू असे म्हणत जरांगे पाटलांनी लग्नाळू तरुणांना सल्ला दिला.