Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : राज्यात एक संपवा संपवी खातं निघालं पाहिजे आणि ते खातं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिलं पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जोरदार टीका केली. या मंत्री पदासाठी फडणवीस योग्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मराठा संपवला, मुस्लिम संपवला, धनगर संपवला, मोठ्या जाती संपवण्याचे काम त्यांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. पाच वर्ष काम केलं नाही फक्त फोडाफोडी केल्याची टीका जरांगे पाटलांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आरक्षण देतील पण, त्यांना फडणवीस आरक्षण देऊ देत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. अजित पवार तर बोलतच नसल्याचे जरांगे म्हणाले.
फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी
रॅली काढायचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी, सत्ता मिळवण्यासाठी काढू नये, कारण आरक्षण दिलं नाही तर सत्ता मिळतच नसते असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि धनगर समाज राज्यात मोठे आहेत. या दोघांना संपवण्याचं काम फडणवीसांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मोठ्या जाती संपवण्याचे काम त्यांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
सगळे मुख्यमंत्री माझ्याच विरोधात
सगळे मुख्यमंत्री माझ्या विरोधात झाल्याचे जरांगे पाटील म्हणाले. अशोक चव्हाण असतील, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सगळे माझ्याविरोधात असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तसेच सगळेच उपमुख्यमंत्री माझ्या विरोधात असल्याचे जरांगे म्हणाले. माझा असा अंदाज आहे की फडणवीस जाणून बुजून आरक्षण मिळू देत नाहीत असं जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीसांना फळ त्यांना भोगावी लागतील
जे चुकले त्यांच्या विरोधात मी बोललो असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. फडणवीस आरक्षण देऊ देत नाहीत, त्याची फळ त्यांना भोगावी लागतील असे जरांगे पाटील म्हणाले. मला सरकारकडून अपेक्षा नाही. कारण त्याचं ठरलं आहे, आरक्षण द्यायचे नाही. त्यांना मराठा ओबीसी यांच्यात भांडण लावायची आहेत. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. त्यांनी सरळ सरळ फसवा फसवी केली असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
निवडणुकीच्या आत आरक्षण दिलं तर ठिक नाहीतर...
सरकारनं मराठ्यांना सांगितलं पाहिजे की, तुम्ही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाहीत? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. निवडणुकीच्या आत आरक्षण दिलं तर ठिक नाहीतर तुमचा विषय संपला असेही जरांगे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार, दरेकर हे खवाट भूत, जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल