Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही माझ्या नादी लागू नका, मी मुंबईला येणार म्हणजे येणारच असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी केलं आहे. फडणवीस ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करत आहेत. फडणवीस यांच्या वागण्याने पंतप्रधान मोदी अडचणीत येतील असे मनोज जरांगे म्हणाले. राज्य सरकार फक्त फसवा फसवी करत असल्याचे ते म्हणाले. मनोज जरांगे नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई वरुन वापस येणार नाही
मराठा आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई वरुन वापस येणार नाही असा इशारा सरकारला मनोज जरांगे यांनी दिली आहे. सरकार नुसती फसवा फसवी करत आहे. कर्जमाफी देतो म्हणून बोलले होते पण दिली नाही. शेतकरी विरोधात गेला आहे तसेच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचे काम सुद्धा फडणवीस करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अडचणीत येतील असे जरांगे म्हणाले. सरकारचे काम म्हणजे सगळी फसवा फसवी आहे फक्त जाती जाती वाद लावण्याचे काम सरकार करत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता थेट सरकारविरोधात आरपारची लढाई छेडली आहे. येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी राज्यभरातल्या मराठा समाजालासोबत घेत मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे.
29 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे राज्यातील सर्व समाजघटकांचे लक्ष
दरम्यान, येत्या 29 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे राज्यातील सर्व समाजघटकांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की,“आमची मागणी न्याय्य आहे आणि ती पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं असून, सरकार, विरोधक, आणि विविध समाजघटक यामध्ये उघडपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मुंबईला जाणार म्हणजे जाणारच अशी भूमिका घेतीआहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. तुम्ही माझ्या नादी लागू नका असेही जरांगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट