Manoj Jarange Patil : 26 तारखेपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी करा, आम्ही मुंबईला येणार नाही असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी केलं आहे. माझ्या जातीचा मला गर्व आहे. बैठक होती मात्र त्याची सभा झाली, ही समाजाची चिड आहे. हे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी समजून घ्यावं, राज्य अशांत करण्याचं काम फडणवीसांनी करु नये असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांच आणि माझं वैर नाही मोठ्या संख्येने 29 तारखेला मराठा समाज मुंबईला जाणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

Continues below advertisement


फडणवीस मराठ्यांचे नुकसान करत आहेत


26 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा हा अल्टिमेटम समजा. मी का तळमळ करतो, हे मराठा समाजाने ओळखलं आहे. त्यामुळं यावेळी मराठा समाज मोठ्या संख्येने जाणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. फडणवीस मराठ्यांचे नुकसान करत आहेत. मी भुजबळांना महत्व देत नाही असे जरांगे म्हणाले. तो कामाचा माणूस नाही त्यांचं वय काय? गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाल पाहिजे असं नेत्याला वाटले पाहिजे. त्यांनी आरक्षण घेतले आम्ही विरोध केला का? म्हणून आम्ही पेटून उठलो आहोत असे जरांगे पाटील म्हणाले. मी मरणाला भीत नाही. भुजबळांनी फडणवीस आणि अजितदादा यांना अडचणीत आणले आहे. मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार असल्याचे ते म्हणाले.  


देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावायचाय


देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावायचा आहे. लक्ष्मण हाके यांना मी विरोधक मानत नाही, आम्ही रोज एकाच्या बांधाला आहोत. कोणाचे तरी ऐकून हाके बोलत आहे. आता निर्धार हा आहे की 26 तारखेआधी अंमलबजावणी करा. एकदा अंतरवली सोडली तर थेट चर्चा मुंबईतच होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  आम्ही गणपतीला मानतो आम्ही मुंबईत अडचण करण्यासाठी येत नाही. गणपती बप्पा त्यांना सदबुद्धी देईलच. आता चर्चा नाही, 26 तारखे आधी अंमलबजावणी करा आम्ही मुंबईला येणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. निघाल्यानंतर चर्चा करणार नाही असे मनोजड जरांगे पाटील म्हणाले. 29 जाती ओबीसीत घेतल्या मग आम्ही काय केलं देवेंद्र फडणवीस यांनी वाटोळ केल्याचे मनोज जरांगे म्हणाले. आता आरपारची लढाई असल्याचेही ते म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार