Manoj Jarange Patil: मराठाआंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा दहाव्या आणि टोकाच्या उपोषणाचा (Hunger Strike) इशारा दिल्यानंतर सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  आणि भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विखे पाटील कुणबी प्रमाणपत्राबाबत आढावा बैठक घेणार असून, त्यानंतर दोन्ही नेते अंतरवालीच्या दिशेने रवाना होतील, अशीमाहितीआहे.

Continues below advertisement

दरम्यान, भाजपनेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या शंकांचे निरसन करून ते आंदोलन मागे घेतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, जरांगे यांनी आंदोलन करणारच असा पवित्रा कायम ठेवल्याने विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई फळाला येते का, हे आज स्पष्ट होणारये. दरम्यानमराठाआंदोलक मनोज जरांगे यांनी केलेलीआंदोलनंआणिकुठल्याकुठल्यानेत्यांची उपोषणनिहाय मध्यस्थ फळालाआलीआहे. हेजाणूनघेऊ.

मनोज जरांगे उपोषणनिहाय मध्यस्थ नेत्यांची यादी (Manoj Jarange Patil Protests)

Continues below advertisement

1 ले उपोषण (29 ऑगस्ट – 14 सप्टेंबर 2023)

गिरीष महाजन संकट मोचक म्हणून ओळख असलेल्या महाजन यांनी मध्यस्थी करून आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. नंतर आमदार अर्जुन खोतकर (शिंदे गट), आमदार राजेश टोपे (अजित पवार गट) जीआर घेऊन भेटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आले आणि उपोषण सोडवले.

2 रे उपोषण (25ऑक्टोबर – 2 नोव्हेंबर 2023)

न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड, न्यायमूर्ती सुनील शुक्रे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, अतुल सावे.

3रे उपोषण (26-27 जानेवारी 2024) (मुंबई)(एक दिवस)

यावेळी काही तत्कालीन विभागीय आयुक मधुकरराजे आर्दड यांनी मध्यस्थी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे मसुदा अधिसूचना जाहीर करून उपोषण सोडवले.

4 थे उपोषण (10-26 फेब्रुवारी 2024)

विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक (10%) एकमताने संमत झाल्यावर उपोषण स्थगित

5वे उपोषण (8– 13 जून 2024)

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे- मंत्री शंभूराज देसाई व खासदार संदीपान भुमरे.

6वे उपोषण (20 – 24 जुलै 2024).

मंत्री शंभूराज देसाई — एका महिन्यात मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन.

7वे उपोषण (17– 25 सप्टेंबर 2024)

कोणताही अधिकृत मध्यस्थ नाही. जरांगे यांनी समाजाच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडले.

8वे उपोषण (25-30 जानेवारी 2025)

जालना जिल्हाधिकारी (लेखी आश्वासन)- आमदार सुरेश धस, बजरंग सोनवणे व आमदार प्रकाश साळुंके यांच्या हस्ते उपोषण सोडले.

9वे उपोषण (29 ऑगस्ट – 2 सप्टेंबर 2025, आझाद मैदान मुंबई)

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (उपसमिती प्रमुख), उदय सामंत, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले — हैदराबाद गॅझेटियर जीआर काढल्यावर विखे पाटील यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडले

मनोज जरांगे यांच्या 10 मागण्या काय? (Manoj Jarange Patil Demands)

1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.

2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.

3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. 

4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. 

5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.

6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. 

7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या. 

8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 

9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. 

10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.