Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आंदोलनाला (Mumbai Maratha Protest) मोठं यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) मान्य असल्याचं सांगितलं. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जीआर काढा एका तासात मुंबई रिकामी करतो असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळं राज्य सरकार पुढच्या एका तासात जीआर काढणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

दरम्यान, सरकारने तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना मान्य आहे. त्यामुळं सरकार पुढच्या एका तासात जीआर काढणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जीआर काढण्यासाठी अधिकारी रवाना झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासोबत असलेल्या अभ्यासकांना देखील सरकारनं काढलेला मसुदा मान्य झाला आहे. मसुदा एकदम योग्य असल्याचं अभ्यासकांचं देखील मत आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय? सरकारचं उत्तर काय?

Q. 1) हैदराबाद गॅझेटियर लागू करा लागू करावे.

सरकारचं उत्तर - हैद्राबाद गॅजेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिली आहे. तात्काळ लागू करणार. जीआर काढणार (सर्व अपडेट ABP Majha वर)

Q. 2) सातारा संस्थान जीआर काढा -

सरकारचं उत्तर -औंध आणि सातारा गॅझेटमध्ये काही त्रुटी आहेत. १५ दिवसात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल. जीआर काढणार

Q. 3) मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

सरकारचं उत्तर - सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेणार, शासन निर्णय जारी करणार. मराठा आरक्षण आंदोलनमध्ये बळी गेलेल्या कुटुंबियांना 15 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन मंडळात नोकरी मिळेल. जर शिक्षण मुलाचा जास्त आले तर सरकारी नोकरीं द्यावी (सर्व अपडेट ABP Majha वर)

Q. 4) आम्हाला कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

सरकारचं उत्तर - मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला. (सर्व अपडेट ABP Majha वर)

Q. 5) 58 लाख कुणबीच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये नोंद करा

उत्तर - जेवढे दाखले आले ते तातडीने द्या असा निर्णय आम्ही घेऊ. आता मनुष्यबळ त्याला दिलं आहे जलदगतीने काम होईल. (सर्व अपडेट ABP Majha वर)

Q. 6) मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे

सरकारचं उत्तर - किचकट आहे त्याला वेळ लागेल 1 महिना लागेल. (सर्व अपडेट ABP Majha वर)

Q. 7) सगेसोयरेचा निर्णय घ्या

उत्तर - याला वेळ लागेल ८ लाख चुकीच्या नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे.

Q. 8) ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या. सगेसोयरे पोट जात म्हणून घ्या.

सरकारचं उत्तर - गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार .

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange Protest : गावातील, कुळातील, नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार, हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करणार; मराठा उपसमितीचा मनोज जरांगेंना शब्द