Manoj Jarange Mumbai Agitation:मराठाआंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यामुंबईतील आंदोलनासंदर्भातएकमोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांना मुंबईपोलिसांनी मोठा झटका दिला आहे. त्यांच्या मुंबईतील 19 सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठाआरक्षणाच्याप्रलंबितमागण्यासाठी 19 तारखेला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार होते. त्यासंदर्भात हमीपत्र देखील मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलिसांना दिलं होत. मात्रपोलिसांनी आझाद मैदान पोलिसानी गेल्यावर्षीच्या अटी शर्तींचा भंग केल्याचा दाखला देतपरवानगीनाकारलीआहे. मागच्याआंदोलनाचा दाखलादेत आझाद मैदानात आंदोलन करताना नियम व अटींचा भंग केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
Manoj Jarange Mumbai Agitation: गेल्यावर्षीच्या अटी शर्तींचा भंग केल्याचा दाखला देतपरवानगीनाकारली
मनोज जरांगे पाटील यांनी जरी मुंबई पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून परवानगी मागितली असली तरी जरांगे पाटील यांनाही मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमीचहोती. तसेच जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावून मुंबईत न येण्याबाबत कळवले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जरांगे पाटील यांनी मागील आंदोलनावेळी मराठा आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर रस्तारोको करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. तसेच आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लघंन केले होते. दरम्यान, मुंबई येऊ घातलेला गणेशोत्सव लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, तसेच या दरम्यान मराठा आंदोलन झाल्यास त्याचा भार हा पोलिस यंत्रणेवरही येऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याचेबोललंजातआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
