Parinay Phuke on Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे सभागृहात मोबाईलवर जंगली रमी ॲपवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत व्हायरल केला आहे. यावर शिवसेना शिंदे गाटचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाठराखण केल्यानंतर आता भाजपचे आमदार आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके (Parinay Phuke ) यांनीही पाठराखण केली आहे. हा व्हिडिओ AI च्या माध्यमातून तयार करुन कोकाटेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा फुकेंनी केलाय. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले परिणय फुके?

तो फेक व्हिडिओ आहे. कोकाटे जिथं बसतात तिथेचं मी त्यांच्या मागं बसतो. मी कधीही माणिकराव कोकाटे यांना असं कधीही गेम खेळताना बघितलेलं नाही. सभागृहाच्या आत कुणीही आपापले मोबाईल बघतात, आम्ही पण बघतो. काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आम्ही गुगलच्या माध्यमातून, चाटच्या माध्यमातून ते घेत असतो. मला असं वाटते की ते तेच घेत असावेत. मात्र, त्यांचा तसा व्हिडिओ घेऊन AI च्या माध्यमातून जंगली रमी चा व्हिडिओ टाकून मंत्री कोकाटे यांनी बदनाम करण्याचं काम रोहित पवारांच्या माध्यमातून होत असल्याचे फुके म्हणाले.

संजय राऊत हे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरी रोज भांडी धूनी करतात, फुकेंचा टोला

AI च्या माध्यमातून तयार झालेला हा फेक व्हिडिओ असल्याचा दावा, माजी राज्यमंत्री तथा भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी केला आहे. संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी रोज भांडी धूनी करतात असे म्हणत आमदार परीणय फुकेंनी संजय राऊत यांना टोला लगावला. अमित शाह यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. सध्याच्या मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना बदलणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावर भाजप आमदार परीणय फुके यांनी, संजय राऊत हे अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी धुनीभांडी करीत असेल म्हणूनचं त्यांना हे सर्व माहीत होत असेल असा टोला लगावला. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Rohit Pawar on Manikrao Kokate : जंगली रमी पे आओ ना महाराज! राज्यात रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अन् कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त; रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा व्हिडीओच केला शेअर