सांगली : सांगलीवाडीतील सुरेश संगाप्पा सुतार या व्यक्तीची कर्नाटकातील विजापूर येथे हत्या झाली. पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून अंधश्रद्धेतून त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मागील तेरा दिवसापासून सुरेश हे बेपत्ता होते. आज कर्नाटकातील विजापूर येथे त्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आणि सांगली शहर पोलिसांचे पथक तातडीने विजापूरला रवाना झाले.
सुरेश सुतार हे सुतारकाम करीत होते. 13 मार्चला घरात कोणाला काही न सांगता ते निघून गेले. पण ते परत आले नाहीत. नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची फिर्याद 15 मार्चला शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
या प्रकरणी नातेवाईकांनी चाँद नामक व्यक्तीवर संशय घेतला होता. पोलिसांनी चाँदला ताब्यात घेऊन चौकशी देखील केली होती. पण काहीच धागेदोरे न मिळाल्याने त्याला सोडून दिले होते. संशयित चाँद हत्येचा सूत्रधार असण्याची पोलिसांना दाट शक्यता आहे.
चाँद याने सुतार यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखविले होते. या बदल्यात त्याने सुतार यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. ज्यावेळी सुतार यांनी पैशाची मागणी केली, त्यावेळी तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला होता. यातून त्यांच्यात वादही झाले होते. हत्येमागे हे कारण पुढे येण्याची शक्यता असल्याचा पोलिसांना संशय असून पोलीस या संशयित आरोपीच्या शोधात आहेत.
पैशाच्या पावसाचे आमिष, लाखो रुपये लुटून हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2018 06:52 PM (IST)
सुरेश सुतार हे सुतारकाम करीत होते. 13 मार्चला घरात कोणाला काही न सांगता ते निघून गेले. पण ते परत आले नाहीत. नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची फिर्याद 15 मार्चला शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -