पुणे - शौचालयात महिलेचं छायाचित्र काढणारा अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2017 12:24 PM (IST)
पुणे: पुण्यात कधी काय घडेल आणि काय नाही हे सांगता येत नाही. कधी डिजिटल जाहिरात फलकावर पॉर्न व्हिडीओ प्ले होतो तर कधी आणखी काही. आता एका बहाद्दराने थेट शौचालयात महिलेचं छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला आणि प्रसंगावधान दाखवून थेट पोलिसांशीच संपर्क केला. त्यामुळे या बहाद्दराचा प्रयत्न फसला. राजकमल यादव असं या आरोपीचं नाव असून, खराडीमधील वर्ल्ड ट्रेडसेंटरमधली शौचालयाजवळ ही घटना घडली. राजकमल यादव हा संबंधित महिलेच्या पाठोपाठ थेट महिलांच्या शौचालयात घुसला. तिथे तो फोटो काढत होता. त्याला महिलेने विरोध केला. त्यानंतर थेट चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये फोन करुन तक्रार दिली. मग पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आरोपी राजकमल यादवला अटक केली. संबंधित बातमी कर्वे रोडवर मोठ्या स्क्रीनवर पॉर्न, ट्रॅफिक जॅममुळे पुणेकरांचे वाजले हॉर्न पॉर्न सर्चमध्ये भारत जगात ‘भारी’, पुणेकरांची आवड न्यारी, गुगल ट्रेंडची आकडेवारी दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवरील स्क्रिनवर पॉर्न पती पॉर्नच्या आहारी, पॉर्नसाईट बंद करा, महिलेची सुप्रीम कोर्टात धाव