एक्स्प्लोर

Vijay Shivtare : संपत्तीच्या लोभापायी भावांनी वडिलांना छळल्याचा ममता लांडे-शिवतारेंचा आरोप, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर

Vijay Shivtare : संपत्तीच्या लोभापायी विनय आणि विनस शिवतारे हे आपल्या वडिलांना छळत असल्याचा आरोप ममता शिवदीप लांडे-शिवतारेंनी (Mamta Shivtare Lande) केला आहे. विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मुंबई : मुलांकडून संपत्तीसाठी होणाऱ्या मानसिक छळामुळे विजय शिवतारेंची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप कन्या ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी केला आहे. विनय शिवतारेंकडून सातत्याने बदनामी करण्याची धमकी मिळत होती, हे सगळं असह्य झाल्याने विजय शिवतारे यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याचं ममता लांडे-शिवतारे यांनी सांगितलं. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तशा प्रकारचा आरोप केला आहे. 

अवघ्या दीड-पावने दोन वर्षांपूर्वी राज्यातील महत्वाचं खातं सांभाळणाऱ्या विजय शिवतारे यांची आताची अवस्था अत्यंत दयनीय असून त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सगळं सुरु असताना त्यांच्या घरातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवतारे यांच्या कुटुंबात दोन गट पडल्याचं समोर आलं असून एका  बाजूला विजय शिवतारे आणि त्यांची कन्या ममता तर दुसऱ्या बाजूला शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि त्यांची दोन मुलं विनय आणि विनस आहेत.

ममता लांडे-शिवतारे यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विनय आणि विनस शिवतारे यांच्यावर वडिलांचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. विजय शिवतारे हे राजकारणी आहेतच, सोबत ते उद्योजक आहेत. त्यांच्या कंपन्यांची वाटणी त्यांनी आपल्या दोन मुलांत केली आहे. जेजुरीतील इथेनॉल प्लांट आहे तो आपल्या नावावर करुन द्यावा असा दबाब विनय आणि विनस शिवतारे आपल्या वडिलांवर टाकत असल्याचा आरोप ममता शिवतारे यांनी केला आहे. 

दुसऱ्या बाजूला विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी आपल्या दोन मुलांची बाजू घेतली असून त्यांनीही फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये गेली 27 वर्षे विजय शिवतारे हे आपल्यासोबत राहत नसून इतर महिलांसोबत राहतात असा आरोप त्यांनी केला आहे. शिवतारे कुटुंबियामध्ये जो काही वाद आहे तो संपत्तीसाठी नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. 

विजय शिवतारे यांच्यावर गेल्या वर्षी प्रकृती गंभीर असताना बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांपासून त्यांना किडनीचा आजार जडला आहे. त्यामुळे एक दिवसाआड त्यांना डायलीसिसला सामोरं जावं लागतंय. आता त्यांना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व सुरु असताना शिवतारे कुटुंबियांमधील कौटुंबिक कलह चव्हाट्यावर आला आहे.

पहा व्हिडीओ : Vijay Shivtare : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Local Body Election आरक्षण मर्यादेबाबत कोर्टात सुनावणी,आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याची आयोगाची कबुली
Special Report Raj Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Kajol Twinkle Khanna Two Much Show Controversy: फिजिकल चीटिंग, लग्नाच्या कमेंटमुळे फसल्या काजोल-ट्विंकल; म्हणाल्या, 'आमची कोणतीही वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका...'
फिजिकल चीटिंग, लग्नाच्या कमेंटमुळे फसल्या काजोल-ट्विंकल; म्हणाल्या, 'आमची कोणतीही वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका...'
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
SEBI : सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, 68 जणांची नोंदणी रद्द
सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, सेबीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 68 जणांची नोंदणी रद्द
Embed widget