Malhar Patil on Omraje Nimbalkar :धाराशिव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात कायमच कलगीतुरा रंगल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तुळजापूरचे नूतन नगराध्यक्ष पिटू गंगणे यांच्या स्वागत कार्यक्रमात राणा जगजितसिंह पाटील पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील (Malhar Patil )यांनी ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar ) यांच्या जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. ओम्याची औकात नाही, दिल्लीत काय दिवे लावतो माहित आहे असं म्हणत मल्हार पाटलांनी ओमराजे  निंबाळकर यांना पुन्हा डिवचलं. 

शेंबड्या पोरांबद्दल यापुढे बोलायचं नाही 

शेंबड्या पोरांबद्दल यापुढे बोलायचं नाही, असे म्हणत मल्हार पाटलांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर जहरी टीका. तुळजापूरच्या मातीची बदनामी करायची हा याच्या प्रचाराचा मुद्दा होता. मात्र, आई भवानीने तो पुसून काढल्याचे मल्हार पाटील म्हणाले. तुळजापूरचे नूतन नगराध्यक्ष पिटू गंगणे यांच्या स्वागत कार्यक्रमात मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांवर हल्लाबोल केला. ओम्याची औकात नाही, दिल्लीत काय दिवे लावतो माहित आहे. शेंबड्या पोरांबद्दल यापुढे बोलायचं नाही असं म्हणत मल्हार पाटलांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर जहरी टीका केली. 

तुझी औकात असेल तर आईस्क्रीम कोणचा अध्यक्ष बसव

तुळजापूरच्या मातीची बदनामी करायची हा याच्या प्रचाराचा मुद्दा होता. मात्र, आई भवानीने तो पुसून काढला. तुळजापुरात नूतन नगराध्यक्ष पिटू गंगणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित स्वागत समारंभात मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांवर हल्लाबोल चढवला. यापूर्वीही मल्हार पाटलांनी जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसवणार तुझी औकात असेल तर आईस्क्रीम कोणचा अध्यक्ष बसव असं म्हणत मल्हार पाटील ओमराजे निंबाळकर यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. 

तुळजापूर नगरपरिषदेत भाजपचे पिटू गंगणे 1770 मतांनी विजयी

तुळजापूर नगरपरिषदेत भाजपचे पिटू गंगणे 1770 मतांनी निवडणुकीत विजयी झाले आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पिटू गंगणे यांना जनतेने विजयी कौल दिलाय. तुळजापुरात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मतदारसंघात दबदबा कायम असल्याचं दिसतंय. तुळजापुरात भाजपकडून पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अमर मगर यांच्यात लढत झाली. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात विरोधाकांकडून ड्रग्ज मुद्द्यांवर जोरदार प्रचार करण्यात आला.ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि आता ते निवडूनही आले आहेत.