Malegaon Sugar Factory Election Result 2025 : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल (Malegaon Sugar Factory Election Result ) लागलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Oawar)  यांच्या नीलकंठेश्वर पॅनलने सहकार बचाव पॅनलचा दारुण पराभव केलेला आहे. 21 पैकी 20 जागा जिंकत नीलकंठेश्वर पॅनल सत्तेवरती आला आहे. यानंतर सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे (Ranjan Taware)  यांनी हा पराभव मान्य करत अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. हा धनशक्तीचा विजय असल्याचा आरोप केलेला तावरेंनी केलाय. अजित पवारांचे स्वप्न पूर्ण झालं नसल्याचे रंजन तावरे म्हणालेत. 

नेमकं काय म्हणाले रंजन तावरे?

सभासदांनी दिलेल्या कौलाचा आम्ही स्वागत करोत. परंतू दारुण आमचा पराभव झाला नाही. या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला या माळेगाव कारखान्याच्या छोट्या निवडणुकीसाठी माळेगावमध्ये बारामतीमध्ये 8 दिवसं थांबावं लागलं. कॅबिनेट सोडून त्यांना इथं यावं लागलं. शेजारच्या मंत्र्यांना त्यांना बोलवावं लागलं, दोन आमदार बोलवावे लागले. जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लावावी लागली. 18 सभा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. 18 सभा घेऊन सुद्धा माळेगावचा सभासद शरण येत नाही म्हटल्यानंतर प्रचंड महालक्ष्मीचं दर्शन त्यांना द्यावं लागलं. त्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत चालू ठेवावी लागली. पैशांची पॅकेट देऊन  सकाळी 10 हजार, दुपारी 10 हजार सायंकाळी परत 5 हजार असे 25 हजार रुपयापर्यंतचे पैशांचे वाटप झाले, अशी दुर्दैवी वेळ अजित पवार यांच्यावर आली असल्याचे रंजन तावरे.  या नेत्याला माझ्या सभासदांनी गुडघ्यावर आणलं, वाड्या वस्त्यावर फिरावं लागल्याचे रंजन तावरे म्हणाले. 

....तरीही तुम्हाला 21-0 करता आलं नाही 

उभ्या महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. माझ्या स्वाभिमानी सभासदांवर माझा विश्वास आहे, सगळ्या सत्तेचा गैरवापर त्यांनी केला. सगळ्यांना कामाला लावायचे काम अजित पवारांनी केल्याचे रंजन तावरे म्हणाले. माळेगावमध्ये असे काय विशेष होते, राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे सोडून माळेगवाचे चेअरमन व्हायला निघालेत असे रंजन तावरे म्हणाले. तरीही तुम्हाला 21-0 करता आलं नाही असे रंजन तावरे म्हणाले. विकासाच्या नावावर तुम्ही मतं मागा. तुम्हाला सगळ्या निवडणुकांमध्ये पैसे वाटावे लागतात. ही वेळ तुमच्यावर का येते? असा सवाल यावेळी त्यांनी केला. 

सत्तेचा प्रचंड गैरवापर, दबावतंत्र, प्रचंड लक्ष्मीदर्शन हेच आमच्या पराभवाचं कारण असल्याचे रंजन तावरे म्हणाले. आमचा स्वाभीमान आहे. आण्ही कुठेही मान झुकवणार नाही असेही रंजन तावरे म्हणाले. कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पुढची लढाई लढली जाईल असे रंजन तावरे म्हणाले. आपण जे जाहीर आश्वासन दिले आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही इतर कारखान्यापेक्षा जास्त दर माळेगाव कारखान्याला देणार, तो शब्द पूर्ण करा असे रंजन तावरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Malegaon Election : माळेगाववर अजित पवारांचे वर्चस्व, 21 पैकी 20 जागा जिंकल्या; चंद्रराव तावरे एकाकी झुंजले, तर शरद पवार पॅनेलचा सुपडा साफ