मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain Update) काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा दमदार हजेरी लावली आहे, महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पूर्वेकडील राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानामध्ये बदल जाणवत असून. पुढील काही दिवसांमध्ये कोकण, सह्याद्रीचा घाट परिसर आणि राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची स्थिती उत्तम राहील. तर विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मात्र, मराठवाडा अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.(weather Update)
तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात आज यलो अलर्ट (Rain Update) जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे कोल्हापूरात सलग सात दिवसांच्या विश्रांतीनंतर काल (शुक्रवारी, ता १७) जिल्ह्यात दमदार पावसाने पुनरागमन केले. या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना पाणी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
Weather Update : पुपरळी शहरासह पावसाची परिसरात दमदार हजेरी
बीडच्या परळीत पंधरा दिवस घेतलेल्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे.रात्री परळी सह परिसरात पाऊस बरसलाय.गेल्या काही दिवसापासून पावसाने परिसरात उसंत घेतली होती.रात्री तासभर झालेल्या पावसामुळे परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याचं दिसून आले.तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरिपाच्या पिकांनाही या पावसाचा फायदा होणार आहे. असे असले तरी अद्यापही मोठ्या पावसाची गरज असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.(Rain Update)
Weather Update : परभणीत मागच्या २० दिवसांपासून पावसाचा खंड
यंदा परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी उघडीप दिली आहे, यंदा एल निनोचे वर्ष असल्यामुळे हे परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. पाऊस नसल्याने त शेत शिवारांमधील विहिरी बोर कोरड्या पडू लागल्या आहेत तर दुसरीकडे पीकही वाळू लागले आहेत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 258 मिलिमीटर पावसाची नोंद व्हायला हवी होती मात्र आतापर्यंत केवळ 135 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे आणि तोही तुटक तुटक त्यामुळे एकीकडे पिके वाळू लागली आहेत दुसरीकडे पाणी शिल्लक नसल्याने पिकं जोपासायची कशी आणि जनावरांना पाणी पाजायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय शेतातील परिस्थितीत पाहून आम्हाला झोप येत नाहीये सरकारने आता तरी आमच्याकडे बघून मदत द्यावी अशी मागणी महिला शेतकऱ्यांनी केली आहे.
Weather Update : गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागामध्ये पावसाचा जोर कायम
काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचे गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस आल्यानंतर मध्यंतरी आठ दिवसापर्यंत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला होता मात्र कालपासून पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्यात पावसाने दमदार कमबॅक केले असून या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठा देखील वाढ झाली आहे. तर जोरदार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जे रखडलेले धान पिकाच्या लागवडीचे काम आहेत त्यांना देखील आता वेग आला आहे.
Weather Update : पालघरमध्ये पहाटेपासूनही पावसाची रिपरिप
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज पहाटेपासूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू असून वातावरण ढगाळ झाले आहे. या पावसामुळे आधीच भात पेरणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून हळव्या भाताची रोपणी सुरू करण्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने हलका पाऊस सुरू राहिल्यास रोपणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आता सुरुवात केली असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.
Weather Update : आज भंडारा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट
भंडारा जिल्ह्यात गेल्या ३६ तासांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली असून, संततधार सुरू असलेल्या पावसामुळं शेतकरी सुखावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळं चिंतेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील भात पिकाला या आता नवसंजीवनी मिळाली असून, रखडलेली शेतीकाम आता पूर्ण वेगानं सुरू झाली आहेत. भारतीय हवामान विभागानं आज भंडारा जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
