मुंबई:  सोलापूरातील एका छोट्याशा गावातून येऊन आपल्या लेखणी आणि दिग्दर्शन कौैशल्याद्वारे मायानगरीत एक वेगळे अस्तित्व निर्माण करणारा नागराज मंजुळे. त्याचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडित काढले. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश-विदेशातही त्याच्या दिग्दर्शनाचे कौतुक होत आहे. या यशस्वी दिग्दर्शकाचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.


नागराज मंजुळेचा परिचय

माझ्या हाती नसती लेखणी, तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसत राहिलो असतो. हा अतोनात कोलाहल मनातला.  मनातला हा कोलाहल मांडायला त्याला सिनेमाचं माध्यम मिळालं आणि त्याने जगलेलं वास्तव रुपेरी पडद्यावर अनुभवताना सारा समाज अंतर्मुख झाला. यशा-अपयशाची पर्वा न करता आपल्या कलाकृतीशी प्रामाणिक राहणारा हा मनस्वी दिग्दर्शक, निर्माता अन् अभिनेता नागराज मंजुळे कवितेतून व्यक्त होत होता.

त्याला कॅमेऱ्याची भाषा उमगली आणि मग त्याच्यातला हळवा तरीही विद्रोही कवी कॅमेऱ्याच्या भाषेत बोलायला लागला.वास्तवाला थेट भिडणारा, रूळलेल्या समीकरणांना शह देणारा राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरत कलात्मकता अन् व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य गाठणारा दिग्दर्शक. त्याच्या सैराटने लोकप्रियतेची व्याख्याच बदलवून टाकली.

मराठी सिनेमा100 कोटींच्या क्लबमध्ये येऊ शकतो, हे स्वप्न त्याने दाखवलं. त्याचं हे मांडणं... बोलणं रसिकांना पिस्तुल्यात भावलं. फॅण्ड्रीत काळजाला भिडलं आणि सैराटने तर झिंगाट करून सोडलं. समाजातील अश्वत्थाम्याच्या जखमा त्याने नेमक्या जोखल्या अन् समाजातील विसंगतीवर आपल्या माध्यमातून भाष्य केलं. केवळ मराठीच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांना झिंगाट करुन सोडणाऱ्या या सैराट दिग्दर्शकास एबीपी माझाचा सलाम.

 

संबंधित बातम्या

ललिता बाबरचा माझा सन्मान २०१६ पुरस्काराने गौरव


 

आपल्या आवजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या महेश काळेंचा ‘माझा सन्मान २०१६’ने गौरव


 

स्वच्छतेला उद्योगाचं स्वरुप देणाऱ्या हणमंत गायकवाडांचा ‘माझा सन्मान 2016’ने गौरव


 

कलाक्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. सुधीर पटवर्धन यांचा ‘माझा सन्मान 2016’ने गौरव


 

गरीब वृद्धांचे दु:ख दूर करणाऱ्या मार्क डिसूझा यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव


 

संशोधन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या डॉ. शुभा टोळेंचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव


 

महाराष्ट्राला याड लावणाऱ्या आर्ची आणि परश्याचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव