Aditi Tatkare Majha Maharashtra Majha Vision : स्त्री पुरुष भेद करणं कमी केलं पाहिजे. विकसित भारत होत असताना महाराष्ट्राचं योगदान जास्त असलं पाहिजे. महिलांचं आणि तरुणांचं योगदान त्यात वाढावं असं मला वाटतं असे मत मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केलं. त्या एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होत्या. 

Continues below advertisement

घडलेला प्रकार अतिशय निंदनीय, घृणास्पद, अशोक खरात प्रकरणावर अदिती तटकरेंची प्रतिक्रिया

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी देखील आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडल्यांनंतर मी मांडावीच असं नाही त्यांची भूमिका तीच माझी भूमिका असल्याचे तटकरे म्हणाल्या. घडलेला प्रकार अतिशय निंदनीय, घृणास्पद आहे. एसआयटी स्थापन झाली आणि ती महिला अधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर आपण भुमिका मांडावी योग्य राहत नाही असे तटकरे म्हणाल्या. पदावर बसल्यानंतर आपण त्याचा गैरवापर करता कामा नये, जबाबदारीने वागायला हवं. वैयक्तिक आयुष्यात कोणासोबत कसे संबंध ठेवावेत हा वैयक्तिक प्रश्न आहे. अशी प्रकरणं घडतात तेव्हा पॉलिटिकल प्रेशर येता कामा नये. यामध्ये मुख्यमंत्र्या्ंच्या निदर्शनास हे प्रकरण आधीच आलं त्यानंतर ते मीडियामध्ये आलं. चौकशीअंती दोषींवर कारवाई होईल असे तटकरे म्हणाल्या. 

कोकण पर्यटनाच्या संदर्भात देखील अदिती तटकरे यांनी भूमिका मांडली. कोस्टल रोड झाल्यानंतर पर्यटक वाढतील असे आदिती तटकरे म्हणाल्या. देशातील अनेक पर्यटक कोकणात येतील पर्यटन रोजगार निर्मितीचा चांगला उपक्रम आहे आणि तोही पर्यावरणस्नेही असल्याचे तटकरे म्हणाल्या.

Continues below advertisement