Rohit pawar Majha Katta : सध्याची स्थिती राज्यासाठी सकारात्मक नाही. सध्या बेरोजगारी मोठी आहे. मंत्री दिलेला शब्द पाळत नसल्याचे वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलं. रोहित पवार यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. भाजपच्या काळातच महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचे रोहित पवार म्हणाले. मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेल्याचे पवार म्हणाले. महाराष्ट्रातील युवकांवर तुम्ही अन्याय केला आहे, त्यामुळं माफी तुम्ही मागावी असे रोहित पवार म्हणाले.
नेत्यांनी मुद्देसूद बोललो पाहिजे
अधिवेशनात आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो मात्र, त्याला मंत्र्यांकडून उत्तरे दिली जात नसल्याचे रोहित पवार म्हणाले. दिलेला शब्द जर मंत्री पाळत नसतील तर सामान्य जनतेची स्थिती काय असेल असे रोहित पवार म्हणाले. मी ज्या अपेक्षेने विधानभवनात आलो, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याचे रोहित पवार म्हणाले. शिक्षण, आरोग्य यावर नेते काहीच बोलत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. विरोधात असो किंवा सत्तेत असो आपण मुद्देसूद बोललो पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.
युवा संघर्ष यात्रेला काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देईल
आम्ही 24 ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा सुरु करत आहोत. याला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटही पाठिंबा देईल असे रोहित पवार म्हणाले. काही लोक कारवाई होईल म्हणून बोलत नसतील, असेही रोहित पवार म्हणाले.
बारामती अॅग्रोच्या कारवाई संदर्भात काय म्हणाले रोहित पवार
बारामती अॅग्रोवर झालेल्या कारवाईच्या संदर्भात देखील यावेळी त्यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणले की, शिंदे गटाच्या एका नेत्याकडून मला निरोप आला होती की कारवाईच्या संदर्भात मुख्यमंत्री यामध्ये नाहीत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सत्तेत सामील झालेल्यांमधील एक नेता आणि भाजपचा एक नेता सामील असल्याचे रोहित पवार म्हणाले. याबाबत इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून सांगितलं होतं की तुम्ही पण कारवाई करा असे रोहित पवार म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारमधील अहंकारामुळं राज्याचं मोठं नुकसान
2013 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमधील नेत्यांच्या अहंकारामुळं राज्याचं मोठं नुकसान झाल्याचा दावा रोहित पवार यांनी माझा कट्ट्यावर केलाय. 2013 पासून राज्यात एक वेगळी परिस्थिती आहे. त्यावेळी ठरावीक नेत्यांनी काम न करता वेगळ्या लेवलला गेल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यानंतर 2014 साली भाजपचं सरकार आलं पुन्हा त्यांचाही अहंकार वाढल्याचे रोहित पवार म्हणाले.