Mahesh Manjrekar VIDEO: बाळासाहेब म्हणाले, तू शिवसेनेत राहा, उद्धव नंतर तूच आहेस; पण मी राज ठाकरेंची...; महेश मांजरेकरांनी कारण सांगितलं
Mahesh Manjrekar On Majha Katta : आपल्याला राजकारणात इंटरेस्ट होता, पण राजकारणात तोंड कधी बंद ठेवायचं हे कळत नसल्याने आपण राजकारण सोडल्याचं महेश मांजरेकर म्हणाले.

मुंबई : मराठी माणसाला मुंबईत आज कुणीही वाली राहिला नाही, त्यामुळे मराठी माणसाच्या भल्यासाठी जर दोन ठाकरे एकत्र येत असतील तर त्यात काय वाईट आहे असं मत दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) व्यक्त केलं. तसेच बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिवसेनेत राहण्यास सांगितलं होतं, पण राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मैत्रीसाठी आपण त्यांना नकार दिल्याचंही ते म्हणाले. महेश मांजरेकरांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा (Majha Katta) या कार्यक्रमात जुन्या आठवणींनी उजाळा दिला.
Mahesh Manjrekar On Politics : मला राजकारणात इंटरेस्ट होता
महेश मांजरेकर म्हणाले की, "राज ठाकरे माझा मित्र आहे. राजकारणात मला खूप इंटरेस्ट होता. 1970-80 पासून मी राजकारण पाहिलं आहे. अशोक चव्हाण माझे मित्र होते. आम्ही दोघेही महाविद्यालयात एकत्र होतो. त्याचे वडील सह्याद्रीला राहायचे. त्यावेळी दोन वर्षे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राहायला होतो. अशोक मला तिकडे नेहमी न्यायचा. पण नंतर मला समजलं की मी या राजकारणासाठी नाही. मला तोंड बंद कधी करायचं कळत नाही, त्यामुळे राजकारणात मी थांबायचं नाही हे ठरवलं."
Mahesh Manjrekar On Raj Thackeray : राज ठाकरेंची मैत्री गमावली असती
महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, "खूप वर्षांनंतर बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की तू मला शिवसेनेत हवा आहेस. उद्धव नंतर तू आहेस. पण मी त्यांना सांगितलं की राज माझा मित्र आहे. त्यानंतर मला अनेकांनी सांगितलं की तू संधी वाया घालवलीस, तू मंत्री झाला असतास. पण त्यावेळी राज ठाकरे माझा मित्र राहिला नसतास. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे."
Mahesh Manjrekar On Marathi Manus : मराठी माणसासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं
मराठीच्या मुद्द्यावर बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, "राज ठाकरेंचा पॉडकास्ट केल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, कोणत्या वर्षापासून मुंबईतून मराठी माणूस कमी होत गेला? मला ते विचारावसं वाटलं. आज मी लोअर परेळला गेल्यानंतर त्या ठिकाणचा मराठी माणूस मला दिसत नाही. तो एकेकाळी मराठी लोकांचा बालेकिल्ला होता. मी शाळेत होतो त्यावेळी लालबाग परळचा पत्ता सांगायची लाज वाटायची. आज तोच एरिया मुंबईतील सर्वात महागडा झालेला आहे. गिरगावातूनही मराठी माणूस आता बाहेर जातोय. मराठी माणसाला कुणीही वाली राहिला नाही. त्यामुळे मराठी माणसासाठी दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटत होतं."
ही बातमी वाचा:


















