मुंबई: कर्नाटक असो वा आणखी इतर शक्ती असो, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत, महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत, त्यामुळे या महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार असा निश्चय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आजचा महामोर्चा हा त्याचाच भाग असून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असंही ते म्हणाले. 


महामोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. ज्या वेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचं मी म्हणालो. मुंबईसह महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही. 


Uddhav Thackeray on Governer Bhagatsingh Kyoshyari: या मोर्चामध्ये महाराष्ट्रद्रोही नाहीत 


आजच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रप्रेमी सामील झाल्याचं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या मोर्चात महाराष्ट्रद्रोही सामील झालेले नाहीत. बाळासाहेबांचे विचार घेऊन जातोय असं म्हणणारं तोतया या मोर्चामध्ये नाहीत.राज्यपाल पद मोठं आहे, त्याचा आम्ही मान ठेवतो. पण राज्यपाल कोण असावा याचा विचार करावा. राज्यपाल महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करतात. त्यावर राज्याचे मंत्री महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई नसत्या तर आज या मंत्र्यासारखे वैचारिक दारिद्र आले असते. 


Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात वैचारिक दारिद्र असणारे मंत्री 


राज्यातील सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आज एक तर वैचारिक दारिद्र असणारे किंवा महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मंत्री आहेत. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी खोकेवाल्या सरकारची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेसोबत केली. चंद्रकांत पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. एका मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आता मुंबईचे लचके तोडले जात आहेत. अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले जात आहेत. आम्ही सत्तेत असताना अनेक प्रकल्प सुरु केले. पण यांनी बंद केले. सध्याचे मुंबईचे पालकमंत्री स्केअर फुटमध्ये बोलतात. 


शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात वैचारिक दारिद्र असणारे मंत्री 


राज्यातील सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आज एक तर वैचारिक दारिद्र असणारे किंवा महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मंत्री आहेत. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी खोकेवाल्या सरकारची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेसोबत केली. चंद्रकांत पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. एका मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आता मुंबईचे लचके तोडले जात आहेत. अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळवले जात आहेत. आम्ही सत्तेत असताना अनेक प्रकल्प सुरु केले. पण यांनी बंद केले. सध्याचे मुंबईचे पालकमंत्री स्केअर फुटमध्ये बोलतात. 


कर्नाटक असो वा आणखी कोणी असोत, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकीय शेवट करणार आणि आजचा मोर्चा हा त्याची सुरवात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आजचा मोर्चा हा एकवटलेल्या शक्तीचा विजय असल्याचंही ते म्हणाले. 


Ajit Pawar on Governer Bhagatsingh Kyoshyari: राज्यपालाना हटवलं पाहिजे, अजित पवारांचा हल्लाबोल 


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. राज्याचे राज्यपाल बोलल्यानंतर पुन्हा मंत्री वादग्रस्त वक्तव्य करतात हे काही बरोबर नाही. या लोकांना माफी मागितली पाहिजे. महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात सरकारने कायदा करावा, विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देतील असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सीमाभागातील गावं इतर राज्यांमध्ये जाण्याची मागणी करत आहेत, याचं सरकारला काहीतरी वाटायला हवं असंही ते म्हणाले. 


राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेले वक्तव्य, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नावर केलेले वक्तव्य आणि महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा, तसेच भाजपनेत्यांनी महापुरुषांच्या विरोधात केलेली वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांसंबंधित महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीकडून आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.