Maharashtra Police : प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेल्या भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या अडचणीत आखणी वाढ झाली आहे. नुपूर शर्मा यांना आता ठाणे पोलिसांनी समन्स पाठवले आहे. शर्मा यांना नोटीस बजावून 22 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.  


इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी शर्मा यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी नुपूर यांना 22 जून रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावले आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 


"नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तपासानंतरच ठरवले जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. याबरोबच पोलिसांनी शर्मा यांना ईमेल तसेच स्पीड पोस्टद्वारे समन्स पाठवले असून, त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


नुपूर शर्मा यांनी  प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप रझा अकादमीने आपल्या तक्रारीत केला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डानेही या मुद्द्यावर नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


काय वाद आहे?


एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील लोक संतप्त झाले आहेत. वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी म्हटलं होतं की, हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नुपूर शर्मा यांनी इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून धमक्या मिळत आहेत. शिवाय भापने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.