Maharashtra Wether Update : उन्हाचा कडाका प्रचंड वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे (Heat Wave) नागरिक हैराण झाले आहेत. कोकणात (Konkan) देखील सध्या तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस या दरम्यान आहे. ही सारी परिस्थिती पाहता दुपारच्या वेळेत शाळा भरवण्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. पालक, शिक्षक यांच्याकडून देखील सकाळच्या सत्रात शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. दरम्यान, या मागणीला आता यश आले आहे. त्यामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील शाळा या सकाळच्या सत्रात भरणार आहेत. 


वाढता उष्मा आणि पाण्याची टंचाई पाहता हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील 2700 शाळा या सकाळी 7 ते दुपारी 12.10 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. प्रशासनानं याबाबत निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल अर्थात आजपासून शाळांच्या वेळेतील बदलाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 


कोरोनामुळे जवळपास दीड वर्ष शाळा बंद होत्या. पण, आता शासनाच्या निर्णयानुसार, सोमवार ते शनिवार पूर्णवेळ तासिका घेण्यात येणार होत्या. तर, रविवारच्या शाळांबाबतचा ऐच्छिक अधिकार हा मुख्याध्यापकांच्या हाती होता. दरम्यान, वाढता उन्हाळा पाहता एप्रिलमध्ये मुलांच्या शाळा दुपारी सुरू ठेवण्यास पालकांमधून विरोध दर्शवला जात होता. 


काही खासगी शैक्षणिक शाळांनी देखील नापसंती दर्शवली होती. मुख्यबाब म्हणजे, कोकणातील काही भागांत मार्चपासून पाणी टंचाई जाणवू लागते. शिवाय उन्हाच्या वाढत्या झळा या देखील त्रासदायक ठरतात. म्हणून शाळा दुपारी सुरू ठेवण्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. पण, पालकांच्या मागणीला यश आलं असूनआता रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहेत.  


कोकणातील वातावरण सध्या आहे तरी कसं?


अंगाची लाही लाही होणे हा शब्द प्रयोग देखील सध्या कमी पडेल अशा प्रकारचं उष्ण तापमान कोकणात आहे. जवळपास 40 डिग्री अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्या कोकणात आहे. मुख्यबाब म्हणजे बाहेर फिरणं देखील नकोसं होत असून दुपारच्या वेळी रहदारीचे रस्ते देखील सुनेसुने दिसतात. या उन्हाचा फटका आंबा पिकाला या उन्हाच्या कडाक्याचा फटका बसत आहे. वाढत्या उन्हामुळे काही ठिकाणी फळगळ देखील होत आहे. तसेच हापूस आंबा आतून खराब होत असल्याची माहिती देखील आंबा बागायतदार शेतकरी देत आहे. मागील दोन वर्षे कोकणातील निसर्गाच्या संकटापुढे शेतकरी हतबल आहे. निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळामुळे बसलेला फटका आणि त्यानंतर यंदा देखील वारंवार वातावरणात झालेल्या बदलामुळे कोकणातील बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. लांबलेली थंडी आणि अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजुच्या फळप्रक्रियेवर परिणाम झाला. पण, त्यामध्ये काही कमी होती म्हणून कि काय वाढत्या उन्हामुळे फळगळती होत असून आंबा आतून खराब होत असल्याची माहिती शेतकरी देतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :