एक्स्प्लोर

Maharashtra Weather: राज्यात 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा; भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाहीर

Maharashtra Weather: राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Weather मुंबई: भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता (Rain In Maharashtra) व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather)

नागरिकांसाठी सूचना- (Maharashtra Weather)

विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.

प्रशासनासाठी उपाययोजना- (Maharashtra Weather)

ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात. हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.

विशेष सूचना- (Maharashtra Weather)

शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सध्याची तापमानाची स्थिती- (Maharashtra Weather)

  • अनेक भागात तापमान 40–45°C
  • अकोलावर्धा येथे 45°C उच्चांक
  • बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त

पुढील अंदाज काय? (Maharashtra Weather)

  • उत्तर भारतात तापमान आणखी 3–4°C ने वाढणार
  • महाराष्ट्रात थोडी घट (20–21 एप्रिल), नंतर पुन्हा वाढण्याची शक्यता
  • अनेक राज्यांत वादळी पाऊस, विजा आणि जोरदार वारे
  • हरियाणा, दिल्ली, राजस्थान, विदर्भ, छत्तीसगड, यूपी इ. ठिकाणी उष्णतेची लाट
  • काही भागात गरम व दमट हवामान
  • रात्रीही तापमान जास्त (Warm night)
  • दिल्ली हवामान (20–23 एप्रिल):
  • तापमान: 41°C ते 44°C
  • आकाश स्वच्छ, पण उष्णतेची लाट

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
पाठीमागून मोठा ट्रक आला, सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत काय घडलं?, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
Rohini Khadse on Ladki Bahin Yojana: वहिनींचे सगळे लाड पुरवता, पण तुम्हाला लाडक्या बहिणी 'जड' झाल्यात का? रोहिणी खडसे फडणवीस-शिंदेंवर संतापल्या; म्हणाल्या, खंबीर 'दादा' आता नाही पण...
वहिनींचे सगळे लाड पुरवता, पण तुम्हाला लाडक्या बहिणी 'जड' झाल्यात का? रोहिणी खडसे फडणवीस-शिंदेंवर संतापल्या; म्हणाल्या, खंबीर 'दादा' आता नाही पण...
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak Raut : सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं
सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Embed widget