Maharashtra Weather Updates: राज्यातीलबहुतांश भागालामुसळधारपावसाने (Maharashtra Rain) अक्षरशःझोडपून काढलंअसूनअनेकभागातपावसाने रौद्ररूपधारणकेल्याचेबघायलामिळतआहे. अशातचआज (1 ऑगस्ट) देखीलराज्यातपावसाचाजोरकायमअसूनविदर्भ, मराठवावाडामध्यमहाराष्ट्र्र, कोकणसहघाटमाथ्यावरजोरदारपावसाच्यासरीकोसळणार (Maharashtra Rain News)असल्याचाअंदाजआहे. विदर्भातीलअनेकजिल्ह्यातअतिवृष्टीमुळेनदीनालेदुथडीभरूनवाहतआहेत. परिणामीजनजीवनविस्कळीतझालेअसूनकाहीगावांचासंपर्क तुटल्याचीदेखीलमाहितीआहे. तरतिकडेहवामानविभागानेदिलेल्या इशाऱ्यानंतरनाशिकआणि नंदूरबारजिल्ह्यातीलअंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांनासुट्टीजाहीरकेलीआहे. संभाव्यपावसाचाइशारालक्ष्यातघेतानागरिकांनीसतर्कराहूनकाळजीघेण्याचंआवाहनप्रशासनाकडूनकरण्यातआलेआहे. (Rain Marathi News)
Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच 13 तालुक्यात अतिवृष्टी, सरासरी 130 मी मी पावसाची नोंद
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच 13 तालुक्यात अतिवृष्टी झालीअसून सरासरी 130 मीमी पावसाची नोंद झालीआहे. यात सर्वात जास्त जळगाव जामोदमध्ये 208 मीमी पावसाची नोंदकरण्यातआलीआहे. तर पूर्णा नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या शेतीचे मोठं नुकसान झालेआहे. तर अनेक गावात अद्यापही पाणी बघायलामिळतआहे. काल बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस हा जळगाव जामोद तालुक्यात तीन तासात 208 मिलिमीटर पाऊस बरसला, त्या पाठोपाठ नांदुरा तालुक्यात 174 मिलिमीटर पाऊस बरसला. या तुफान पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं.
Buldhana Rain : पूर्णा नदीला पूर, बुलढाणा, अकोला अमरावतीसह वाशिम जिल्ह्यालापुराचाफटका
दरम्यान, अकोलाअमरावती व वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदीला मोठा पूर आलाय. पुराचे पाणी नदीपात्राच्या बाहेर जाऊन शेतात शिरल्याने शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. सध्या ही पूर्णा नदीने रौद्ररूप धारण केलेलं असून नदीकाठील अनेक गावात अद्यापही पाणी असल्याचं बघायला मिळत आहेत.
जळगाव जिल्ह्यात काल पासून झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यात मात्र कळंमडु गाव परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांच्या पिकांसह संपूर्ण जमिनीचं खरडून वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. यंदा सुरुवाती पासूनच पाऊस नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करून शेतकऱ्यांनी आपली पिके उभी केली होती. दोन दिवस पासून रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असताना, आज पहाटेच्या सुमारास अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला,आणि पिकांसह शेतजमीन ही खरडून गेल्याने पुढील काळात आता या जमिनी कशा पिकवायचा, असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या पुढे पडला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत मिळून द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत
Jalgaon : नागपूर मुंबई महामार्गावर मुसळधार पावसाचा फटका उड्डाण पुलाचा भराव खचला
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. यावेळी मुंबई नागपूर महामार्गावर पाळधी-तरसोद बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलाचा भराव पावसामुळे खचला आहे. रेल्वे उड्डाण पुलाजवळील ही घटना आहे. जळगाव तालुक्यातील असोदापासून पुढे भुसावळकडे चढताना हा पूल असून त्याचा भराव खचला आहे. काही दिवसापूर्वीच या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते मात्र पावसामध्ये या रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र बघाव्यास मिळत आहे
24 तासातील पाऊस
तालुका- झालेला पाऊस
यवतमाळ-146.6 मिमी
बाभूळगाव-164.4 मिमी
कळंब-149 मिमी
दारव्हा-200.9 मिमी
दिग्रस-174.7 मिमी
आर्णी-203.4 मिमी
नेर-222.7 मिमी
पुसद-131.2 मिमी
उमरखेड-109.5 मिमी
महागाव-150.7 मिमी
केळापूर-99.1 मिमी
घाटंजी-146 मिमी
राळेगाव-110.5 मिमी
Nashik Rain: नाशिक जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशिक जिल्ह्यात 31 जुलै रोजी हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' आणि अतिवृष्टीचा इशारा मिळाल्याने प्रशासनाने मोठी घोषणा करत खबरदारीचा उपाय म्हणून 1 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील 8 प्रमुख तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीरकेलीआहे. यात मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) ची टीम नाशिकमध्ये पूर्वप्रतिबंधात्मक उपाय म्हणून तैनात असणारआहे. तर पर्यटनस्थळे, धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स आणि पूरप्रवण भागांत नागरिकांच्या प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यातआलीआहे. आठवडी बाजार, जत्रा, मेळावे रद्द; धोकादायक व सखल भागातील नागरिकांना १०० टक्के सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यातआलेआहे. शिक्षकांसह सर्व शासकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयात २४x७ अलर्ट राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सज्ज राहण्याचे निर्देश देण्यातआलेआहे.
