Maharashtra Weather Updates: मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टी भागात सक्रिय असलेल्या मान्सून ट्रफचा परिणाम राज्याच्या हवामानावर पाहायला मिळतोय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, मुंबईत आजही पावसाची रिपरिप कायम राहण्याचा अंदाज आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाचा (Maharashtra Weather Updates) इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानुसार, 17 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात 17 ऑगस्टपर्यंत, तर विदर्भात 17 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Continues below advertisement

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून जोरदार पावसाची संततधार सुरु आहे. जोरदार पावसामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतून धीम्या गतीने सुरु आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. सायन-बेलापूर महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी आहे. एलबीएस मार्गावर भांडूप ते विक्रोळी दरम्यान वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर जेव्हीएलआर आणि एससीएलआरवर वाहतूक सुरळीत सुरू आहे. (Maharashtra Rain Updates)

पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट- (Pune Nashik Raigad Kolhapur Rain)

पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाट परिसरात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Continues below advertisement

पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण- (Maharashtra Weather Updates)

पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे. यवतमाळसह काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसामुळे स्थानिक पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि झाडे पडण्याचा धोका हवामान विभागाने नमूद केला आहे. मुंबई आणि परिसरातही पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी प्रवास करताना आणि सखल भागात जाताना काळजी घ्यावी. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जिल्हानिहाय इशारे आणि अपडेट्स जारी केले जात आहेत.

कोणत्या भागात अधिक पाऊस? (Mumbai Raigad Pune Konkan Rain)

कोकण आणि घाट परिसर पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा धोका कुठे? (Rain In Maharashtra)

हवामान विभागाच्या इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्टनुसार जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूर, जुन्या किंवा कमकुवत संरचना कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. घाट परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढू शकतो.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती