Maharashtra Weather Updates: येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तसेच चालू महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 13 ऑगस्टपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Maharashtra Rain Marathi News)
चीनच्या किनारपट्टीवर धडकलेल्या डॉल्फिन चक्रीवादळाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात मोठे वादळ किंवा तीव्र हालचाली सक्रिय असतात, तेव्हा ते भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची दिशा आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टवाची निर्मिती तात्पुरती मंदावू शकतात. त्यामुळेच बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या ढगांचे प्रमाण घटले असून, भारतात पावसाने ब्रेक घेतल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांत आज पावसाच्या सरी- (Rain In Mumbai)
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांत आज सकाळी मुसळधार पावसाची (Rain In Mumbai) हजेरी पाहायला मिळाली. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून जोरदार पावसाची संततधार सुरु आहे. मुंब्रा, महापे, ऐरोली भागात पहाटेपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. महापे, ऐरोलीमधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक देखील धीम्या गतीने सुरु आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतून धीम्या गतीने सुरु आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सायन-बेलापूर महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Mumbai Rain Updates)
पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण- (Maharashtra Weather Updates)
पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे. यवतमाळसह काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसामुळे स्थानिक पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि झाडे पडण्याचा धोका हवामान विभागाने नमूद केला आहे. मुंबई आणि परिसरातही पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी प्रवास करताना आणि सखल भागात जाताना काळजी घ्यावी. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जिल्हानिहाय इशारे आणि अपडेट्स जारी केले जात आहेत.
कोणत्या भागात अधिक पाऊस? (Mumbai Raigad Pune Konkan Rain)
कोकण आणि घाट परिसर पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा धोका कुठे? (Rain In Maharashtra)
हवामान विभागाच्या इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्टनुसार जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूर, जुन्या किंवा कमकुवत संरचना कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. घाट परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढू शकतो.
नवी मुंबई परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, VIDEO:
संबंधित बातमी:
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
