Maharashtra weather update: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचे हायलर्ट देण्यात आले होते . हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात मराठवाडा ,मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे . सातारा सांगलीसह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता आहे .मुंबई, उपनगरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय.
हवामान विभागाचा अंदाज काय ?
अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे मध्य महाराष्ट्र ,कोकण ,गोवा भागात 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे .रक्षाबंधनानंतर पुढील दोन दिवस मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत .राज्यभर पावसाचा जोर पुढील तीन दिवस काहीसा कमी होणार असून पुन्हा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे .
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट ?
10 ऑगस्ट : रत्नागिरी ,सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ,धाराशिव ,बीड, लातूर, परभणी ,नांदेड, हिंगोली, बुलढाणा ,अकोला, वर्धा व नागपूर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट आहे .मुंबई, ठाणे, रायगडसह पुणे, नाशिक ,नगर, छत्रपती संभाजीनगर ,जळगाव भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे.11 ऑगस्ट : बीड, धाराशिव ,लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला व चंद्रपूर यलो अलर्ट12 ऑगस्ट : बीड, धाराशिव, लातूर ,बुलढाणा, अकोला ,भंडारा ,गोंदिया, गडचिरोली13 ऑगस्ट : रत्नागिरी, रायगड,परभणी, हिंगोली, नांदेड,चंद्रपूर,गोंदिया गडचिरोली
मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण
मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळी हलक्या सरींची शक्यता आहे .रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे .जुलै महिन्यातील पावसाच्या विश्रांतीनंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली . आता पुढील आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर काहीसा वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे . पालघर, सिंधुदुर्ग आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात, एनआयके आणि तेलंगणाच्या काही भागात पुढील १.२ तासांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या सध्याच्या अंदाजावर लक्ष ठेवा. कोकण गोवा प्रदेशात अंशतः ढगाळ हवामान राहणार असल्याचा अंदाज आहे.