Maharashtra Weather Update: महाराष्ट्र उन्हाळ्याच्या शिखरावर पोहोचला असताना आता भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांसह महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.(IMD) अनेक भागात पावसाच्या इशाऱ्यांमुळे उष्ण व दमट हवामान होत असून उष्णतेचा पारा गेल्या चार दिवसांच्या तुलनेत काहीसा घसरला आहे. आज वादळी वाऱ्यासह मुसळधारा येणार असून तापमानात नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता पुन्हा अवकाळीचा इशारा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

विदर्भात गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा उच्चांक पहायला मिळत आहे.  आज अमरावती वर्धा, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसह नांदेड, लातूर धाराशिव सोलापुरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उष्मा प्रचंड वाढला आहे. अनेक भागात दमट वातावरण आहे त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा घामाच्या धारा असा एकत्रित अनुभव येतोय.

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.  हवामान खात्याने आज 13 एप्रील रोजी 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला असून उद्या विदर्भाकडून पूर्वेकडे खाली उतरत कोल्हापुरापर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उकाडा, वादळीवाऱ्यासह पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पावसाने चांगलंच झोडपून काढलं. सकाळ पासून सूर्य अन ढगांचा लपंडाव सुरु होता. वातावरणात ही उकाडा निर्माण झाला होता. मात्र दुपारी दीडच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळं शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला  होता त्यानंतर आज सकाळ पासून नांदेड मध्ये ढगाळ वातावरण पाहिला मिळाले होते दुपारी 2.30 वाजता पावसाचे आगमन झाले वाढत्या तापमानामुळे नांदेडकर चांगले सुखावले मात्र या अवकाळी पावसाने शेतीला चांगला फटका बसला या पावसामुळे फळबागेचे नुकसान होईल.

आज कुठे किती पारा?

मुंबई उपनगर: 33.5°C, मुंबई शहर: 33.8°C, ठाणे: 38.0°C, पालघर: 34.9°C, रायगड: 33.0°C, रत्नागिरी: 33.0°C, सिंधुदुर्ग: 33.0°C, पुणे: 37.7°C, सातारा: 37.2°C, सांगली: 35.8°C, कोल्हापूर: 35.8°C, सोलापूर: 40.2°C, नाशिक: 35.4°C, जळगाव: 38.5°C, नंदुरबार: 39.8°C, छत्रपती संभाजीनगर: 41.4°C, परभणी: 39.5°C, लातूर: 38.9°C, नांदेड: 39.2°C, अकोला: 40.2°C, वाशीम: 41.0°C, बुलढाणा: 38.6°C, अमरावती: 39.6°C, यवतमाळ: 39.5°C, वर्धा: 39.8°C, नागपूर: 41.1°C, चंद्रपूर: 42.6°C, गडचिरोली: 39.6°C, गोंदिया: 39.6°C

हेही वाचा:

शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बील कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा