Maharashtra Weather Update :राज्यातीलहवामानामध्ये (Maharashtra Weather) मोठीतापवतपाहायलामिळतआहे. कुठेउष्णतेचाकहरबघायलामिळतअसूनतापमानाच्यापाऱ्यानेचक्क 46 ते 47 अंशाचाटप्पापारकेलाआहे. तरकुठेमान्सूनपूर्वपावसानेएकचदाणादाणउडवल्याचेचित्रआहे. निसर्गाच्यायालहरीपणाचासर्वाधिकफटकाआता शेतकऱ्यांनाहोतांनादिसतोय. अशातच हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाची .(Unseasonal rain) शक्यता वर्तवत पावसाचं 'येलो अलर्ट' जारी केला आहे. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहरआज (24 मे) देखीलकायमराहणारआहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत असून तिथे उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. संभाव्यइशारालक्ष्यातघेतानागरिकांनीयोग्यतीखबरदारीघ्यावी, गरजनसेलतरदुपारच्यासत्रातघराबाहेरपडूनये, अशासूचनादिल्याआहे. (Maharashtra Weather Update)
Vidarbha Heat: विदर्भात उष्णतेचा कहर, काही भागात पावसाचा हाहाकार
हवामान विभागाने (IMD) दिलेल्यामाहितीनुसार, देशात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यातआलीआहे. शनिवारी ब्रह्मपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यातआलीआहे. त्या सोबतच, चंद्रपुरातील तापमान देखील 46.2 अंशांवर नोंदवलंगेलंआहे. तरआजदेखील विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने येथे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.
Vidarbha Heat: विदर्भाततापमानाचाकहर, सलग चौथ्या दिवशी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट
विदर्भात आज सलग चौथ्या दिवशी अमरावती, चंद्रपूर व वर्धा या तीन जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे. तर नागपूर, यवतमाळ , अकोला व गडचिरोली जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भात काल (23 मे) सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे 47.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर 46.2, गडचिरोली 46,अमरावती 45.4, नागपूर 45 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नागपूर वेध शाळेकडून आज देखील वर्धा ,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाचीहजेरी; पुढचे दोन दिवस पाऊसकायमराहणार
हवामानविभागानंवर्तविलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरीत सकाळपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. तर दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळतअसल्याचीमाहितीआहे. रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वर या भागात मॉन्सूनपूर्व पाऊस पडतअसून हवामान विभागाने पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाच्या अनेक ठिकाणी सरींमुळे हवेत गारवा निर्माणझाल्याचेचित्रआहे. पुढील दोन दिवस अशाच पद्धतीने पावसाच्या सरी बरसतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Maharashtra Weather : कोकण आणि घाट परिसरात पावसाचा 'येलो अलर्ट'
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्याने त्यांच्या घाट परिसरात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हवामान विभागाने या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
दुसरीकडे, जालन्यात मान्सून पूर्व पावसाचा केळी बागांना मोठा फटका बसलाअसूनयातएका महिला शेतकऱ्यांची केळी बाग उध्वस्त झालीआहे. दरम्यान, परतुर तालुक्यातील फुलवाडी शिवारात झाडाची फांदी पडून महिला जखमी झाल्याचीघटनाघडलीआहे. तर सौरऊर्जेचे पॅनलचेहीमोठं नुकसान झालंअसूनयात एक पशुधन दगावले आहे.
Yavatmal: यवतमाळच्या दिग्रसमध्ये एकाच दिवशी तिघांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय
विदर्भाततीव्रउष्णतेचीलाटपसरलीअसूनयाचेपरिणामआताप्रकर्षानेजाणवूलागलेआहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये एकाच दिवशी तिघांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्तकरण्यातयेतोय. यातील एकाची ओळख पटली असूनइतर दोघांची ओळख अद्यापही पटली नाहीये. दिग्रस शहरातील वेगवेगळ्या भागात हे मृतदेह आढळून आले असूनयाघटनेने शहरात मोठी खळबळ उडालीआहे. यवतमाळ जिल्ह्यात सूर्याने आग ओळखण्यास सुरुवात केली असताना एकाच दिवशी तिघांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ओळख पटलेल्या मृतांचे नाव आनंद राजु वाडवे (26, राहणार म्हैस गव्हाणे, हिंगोली) असे असून दोघांची ओळख पटलेली नाही.
Bhandara : भंडाऱ्यात सलग चौथ्या दिवशी तापमान 45 डिग्री सेल्सिअस; असाह्य उकाड्याने नागरिक त्रस्त
भंडाऱ्यात सलग चौथ्या दिवशी 45 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. अगदी सकाळपासून उष्ण वारा आणि कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. असह्य उकड्यामुळे अनेकांनी शीतपेयाची दुकानात थंड पेय पिऊन शरीराची होणारी लाहीलाहीपासून बचाव करताना नागरिक बघायला मिळालेत. तर, प्रचंड उष्णतेमुळं रस्त्यांवर तुरळक वाहतूक बघायला मिळाली.
जालना जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. परतुर तालुक्यातील फुलवाडी येथील महिला शेतकरी यशोदा अब्दल यांची तब्बल दीड एकर केळी बाग वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने केळीची झाडे आडवी पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
Pre Monsoon Rain: मान्सूनपूर्वपावसाची एकचदाणादाण; हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त
दरम्यान, फुलवाडी शिवारात झाडाची मोठी फांदी पडून एक महिला जखमी झाली असून सौरऊर्जेच्या पॅनलचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच एका पशुधनाचाही मृत्यू झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने परतुर, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा दिला आहे. हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत.
Monsoon News : दिलासादायक! राज्यात 29 मे पासून मॉन्सुन पूर्व पाऊस पडणार, शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून येत्या २९ मेपासून राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारेही वेगाने पुढे सरकत असल्याने मान्सून महाराष्ट्रात नेहमीपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाईगडबड करू नये, असा महत्त्वपूर्ण इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.
