Maharashtra Weather Update: राज्यात सगळ्याच भागात तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेचा पारा टोक गाठत असल्याचे चित्र आहे.आज रविवार(20 एप्रिल) रोजी विदर्भ मराठवाडा प्रचंड तापला आहे. बहुतांश ठिकाणी 40-45 अंश सेल्सियसच्या नोंदी होत आहेत. (IMD) आयएमडीने नोंदवलेल्या कमाल तापमानानुसार, आज राज्याच्या उपराजधानीत नागपुरात तब्बल 44.7 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे. (Temperature Today)
अकोल्याचा पारा 44.3 अंश सेल्सियसवर आहे तर संपूर्ण विदर्भाचे तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे आहे. मराठवाडाही चांगलाच तापला असून परभणीत 43.6 अंश तर बीड 42 अंशांवर स्थिरावले आहे. संपूर्ण कोकणपट्ट्यात तसेच मुंबई व मुंबई उपनगरात प्रचंड उकाडा जाणवतोय. उन्हाचा चटका असह्य झाला आहे. येत्या पाच दिवसांत सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर सांगलीत हलक्या पावसाची शक्यता वगळता अन्य कुठेही पावसाची शक्यता नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट
आजपासून येत्या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण हवामान राहणार आहे. तर पुणे, सोलापूर जिल्ह्यातही आज उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. 21 एप्रील रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. किमान तापमानाचा पाराही सध्या सामान्यहून अधिक असल्याने मुंबई व उपनगरात आज पारा अधिक नोंदवण्यात आला.
तुमच्या जिल्ह्यात तापमान काय?
नागपूर – 44.7°C, परभणी – 43.6°C, चंद्रपूर – 44.0°C, ब्रम्हपुरी – 43.6°C, वर्धा – 43.0°C, गोंदिया – 44.0°C, अमरावती – 43.8°C, यवतमाळ – 42.5°C, वाशीम – 41.8°C, अकोला – 43.5°C, बुलढाणा – 40.0°C, औरंगाबाद – 41.7°C, जळगाव – 41.7°C, लातूर – 41.2°C, बीड – 42.6°C, हिंगोली – 42.1°C, पुणे – 39.4°C, नाशिक – 37.3°C, सातारा – 39.7°C, सांगली – 37.1°C, मुंबई उपनगर – 33.0°C, मुंबई शहर – 33.4°C, ठाणे – 36.0°C, पालघर – 35.2°C, रत्नागिरी – 32.9°C, सिंधुदुर्ग – 32.0°C
हेही वाचा: