Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका पाहयला मिळत आहे. तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान मागील तीन चार दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं कहर केला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, उद्या (2 डिसेंबर) मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.  


कोणत्या भागात काय स्थिती राहणार?


मध्य महाराष्ट्र


खान्देश, नाशिकसह सोलापूर पर्यंतच्या 10 जिल्ह्यात उद्या शनिवार 2 डिसेंबर) पर्यंत ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परंतु परवा रविवारी 3 डिसेंबरपासून तिथे पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. 


मराठवाडा 


मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 4,5 डिसेंबर असे दोन दिवस फक्त ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर 6 डिसेंबरपासून मराठवाड्यात पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवणार असल्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. 


विदर्भातील काय स्थिती राहणार?


विदर्भातील 11 जिल्ह्यात मात्र आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दिनांक 5 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तिथेही बुधवार दिनांक 6 डिसेंबरपासून पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल अशी शक्यता मामिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. सोमवार दिनांक 4 डिसेंबरला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी सीमावर्ती भागात आदळणारे ' मिचोंगं ' नावाचे सौम्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही विशेष वातावरणीय परिणाम जाणवणार नाही. 


अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका


अवकाळी पाऊस (Unseasonal Rain)  आणि गारपिटीमुळे  नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्षभर मेहनत करून तयार केलेली पीक अवकाळी पावसामुळे शेतातच कोलमडून पडली आहेत. त्यामुळे या शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न उपस्थित केला. अनेक ठिकाणी फळबागांना देखील फटका बसला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पृथ्वीचं वाढतं तापमान हे अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचे डख म्हणाले. भविष्यात अवकाळी पावसाला, गारपीटीला सामोर जावं लागणार आहे. हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अशी स्थिती निर्माण होत 


महत्त्वाच्या बातम्या:


पुढील तीन दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कधी पडेल पाऊस?