Maharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊस (Rain) पडतोय तर कुठं पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


दरम्यान, पुढील 36 ते 48 तासात पावसाचे पुनरागमन होणार असल्याची माहिती  हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी दिली आहे. आज आणि उद्या मध्यम पावसाची अपेक्षा आहे. सोमवार, मंगळवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा जोर हळूहळू वाढणार असल्याची शक्यता आग्रे यांनी वर्तवली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात तापमानात घट होईल असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय.


मुंबईसह ठाण्यात देखील पुढील आठवड्यात कोसळणार पाऊस


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागात वगळता उर्वरित ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता कमी झाली असून राज्यात सर्व भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहे. मुंबईसह ठाण्यात देखील पुढील आठवड्यात हलक्या पावसाला सुरवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे. दरम्यान, पाऊस ओसरल्यानं मुंबईत पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान  विभागाने व्यक्त केला आहे. शहर परिसरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाची दडी मारली आहे. काही भागात अधूनमधून पाऊस  कोसळत आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. मात्र, आता पुढील आठवड्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं उकाडा कमी होणार आहे.


राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मुंबई ठाणे पालघर वगळता संपूर्ण राज्याच आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain Update: कुठे विश्रांती तर कुठे मुसळधार! नगरमध्ये पुरस्थिती, बीडमध्ये शाळांना सुट्टी, जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती