Maharashtra Weather : वातावरणात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या संपूर्ण आठवड्यात राज्यातील तापमान नेमकं कसं राहिल? याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrav Khule) यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

ढगाळ वातावरणासहित किंचितशीच थंडी

आज व उद्या (सोमवार व मंगळवार दि. 23 व 24 डिसेंबर) ला मुंबई, कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात बोचऱ्या वाऱ्यासहित माफक प्रमाणात थंडीची शक्यता ही कायम असल्याचे खुळे म्हणाले. त्यानंतर बुधवार आणि गुरुवार दिनांक 25-26 डिसेंबरला ढगाळ वातावरणासहित किंचितशीच थंडी कमी होवून संपूर्ण महाराष्ट्रात ऊबदारपणा जाणवेल अशी माहिती खुळे यांनी दिली आहे. 

तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार ते शनिवार दिनांक 26 ते 28 डिसेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार धुळे जळगांव  मालेगाव नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर वाशिम शेगाव नगर पुणे नागपूर गोंदिया चंद्रपूर नांदेड परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते. 

Continues below advertisement

या परिसरात गारपीटीची शक्यता

सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर ला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण 25 जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार धुळे जळगांव  नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर गोंदिया वर्धा वाशिम  ह्या जिल्ह्यात व लगतच्या परिसरात गारपीटीची शक्यता अधिक जाणवते. वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दिनांक 30 डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होवून नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.

या बदलत्या वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. या दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा, असेही खुळे यावेळी म्हणाले. कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra Weather Updates : राज्यात गारठा वाढला! जळगावमध्ये 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, जाणून घ्या कसं असणार हवामान