Maharashtra weather update: सध्या कोकणपट्ट्यात व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे . मराठवाड्यातही पावसाला पोषक स्थिती असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची उघडीप आहे . हवामान खात्याने आज रायगड रत्नागिरीसह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे . या भागात मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची ही शक्यता आहे .
मुंबई ,ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथ्यावर तसेच तळ कोकणात सिंधुदुर्ग सातारा व कोल्हापूर माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे .या भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय .मराठवाड्यात आज परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भात अमरावती, नागपूर ,भंडारा, चंद्रपूर, आणि गडचिरोली तसेच नंदुरबारमध्येही पावसाचा अलर्ट आहे . पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. (Weather Alert)
मराठवाड्यात पावसाला पोषक स्थिती
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासात बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे .पुढील तीन दिवस मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून दोन दिवसांनी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे .
किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार
तळ कोकणापासून ते मुंबई पालघर पर्यंत किनारपट्टी असणाऱ्या भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे .सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागात पुढील तीनही दिवस पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले असून सोमवारी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे .पुणे, सातारा, कोल्हापूर व नाशिक घाट परिसरात पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत . पुढील दोन दिवसात विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे ..कल्याण, डोंबिवली व पालघर भागात मेघगर्जनेसह ढगांची संख्या 4.5 किमी पर्यंत असल्याचे दिसून आले आहे. पुढील 2.3 तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावर लक्ष ठेवा. असा इशारा हवामान विभागानं दिलाय.
राज्यभरात दोन ते तीन अंशांनी कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलं .कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसात तापमानात फारसा परिणाम होणार नाही .विदर्भात तापमान दोन ते तीन अंशांनी घसरेल असा अंदाज आहे .
हेही वाचा: