Maharashtra weather update:  राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून सर्व दूर पावसाची हजेरी लागली आहे .अनेक भागात सकाळपासून मुसळधार पावसाची नोंद होतेय . काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून IMD ने आजही राज्यात विविध ठिकाणी अलर्ट दिले आहेत . गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे . (Dam Water Release)

साताऱ्यात कोयना, धोम, कन्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीये .नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे . विठुरायाच्या पंढरपुरावर पुन्हा एकदा पुराची टांगती तलवार असून चंद्रभागेच्या पात्रात 50 हजार क्युसेकपेक्षा अधिक विसर्गने पाणी येणार असल्याचं सांगितलं जातंय . कुठे काय परिस्थिती कोणत्या धरणांमधून विसर्ग सुरू आहेत ? पाहूया सविस्तर .

उजनीतून विसर्ग वाढवला, चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ

उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून आता 41,600 क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे .यामुळे नदीकाठच्या सर्व लोकांना सावधान त्याचा इशारा देण्यात आलाय .पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पात्राच्या जवळ न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय .वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही 10 हजारांपर्यंत नेण्यात आला असून या दोन्ही धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे .चंद्रभागेच्या पात्रात 50 हजार क्युसेक पेक्षा अधिक विसर्ग येणार असून पुन्हा एकदा पंढरपुरावर पुराची टांगती तलवार आहे .पुणे आणि साताऱ्यातील पाऊस न थांबल्यास पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे .

कोयना, धोम अन् कन्हेर धरणातून विसर्ग वाढला

सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम आणि कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने, कोयना नदी, संगम माहूली येथील वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरणाचे पाच फुटाणे दरवाजे उचलल्याने 20, हजार 900 पाण्याचा पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.धोम धरणातून 7000 क्युसेक इतका विसर्ग कृष्णा नदी पात्रात होत असून कण्हेर धरणातून 4,100 पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात केला जात आहे.. यामुळे कोयना, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढली आहे.

विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडले

संततधार पावसामुळे नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण 89 टक्के भरलं आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 59 हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे .. मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सूरू असल्याने गोदावरी नदी दूथडी भरून वाहत आहे .. त्यामूळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ..त्यामूळे आपत्ती व्यवस्थापन , एसडीआरएफच्यां पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत .. अजूनही गोदावरी नदीत पाण्याची आवक सुरूच आहे .. त्यामूळे विसर्ग वाढण्याची शक्यता आहे ... विशेष म्हणजे गेल्या चार दिवसापूर्वी विष्णुपुरी धरणात 24 टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता .. मात्र दोन दिवसाच्या पावसाने धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याची परिस्थीती निर्माण झाली .. गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्याने रात्री दोन आणि आज सकाळी दोन दरवाजे उघडले. या पावसाळयात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

परभणीच्या गंगाखेडमधील गोदाघाटासह मंदिरेही पाण्याखाली 

काल परभणी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला यामुळे गोदावरी वरील चारही बंधारे तुडुंब भरले आहेत या चारही बंधाऱ्यांमधून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून गोदावरी तुडुंब भरून वाहत आहे गंगाखेड मधील गोदा घाट पूर्णतः पाण्याखाली गेला असून मंदिरही पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे गोदावरी नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निळवंडे धरणातून नदीपात्रात सांडव्याद्वारे विसर्ग...

निळवंडे धरणातील विसर्ग वाढवून 8500 क्युसेक करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे आणि इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच प्रशासनानं आवाहन केलंय.भंडारदरा आणि निळंवडे धरण पाणलोटात पावसाचा जोर कायम आहे.धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी भंडारदरा आणि नळवंडे धरणातून पाण्याचा‌ विसर्ग सुरुय.

गोसेखुर्द धरणाचा विसर्ग आणखी 14 हजार क्यूसेकने वाढविला

भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं धरण प्रशासनानं धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात तीन तासांतचं आणखी मोठी वाढ केली आहे. सकाळी १९ दरवाजे एक मीटरनं तर, १४ दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आली होती. त्यात तीन तासातचं आणखी मोठी वाढ केली आहे. २ लक्ष ११ हजार ८५३ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळीच्या तुलनेत १४ हजार ४०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.