मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व प्रमुख पक्षांनी एक-दोन याद्या जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकही यादी जाहीर केली नव्हती, त्यामुळे पक्षांतर्गत तसेच आघाडीअंतर्गत असलेल्या वादांबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 77 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.


77 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील वरळीच्या मतदारसंघात अद्याप उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे वरळीबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

राष्ट्रवादीकडून बारामतीतून अजित पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, परळीतून धनंजय मुंडे, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळमधून सुमन आर. पाटील, घनसावंगीमधून राजेश टोपे, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, दिंडोशीतून विद्या चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची संपूर्ण यादी
1. सिंदखेडा – संदिप बेडसे
2. चोपडा – जगदिश वळवी
3. जळगाव ग्रामीण – पुष्पा महाजन
4. अमळनेर – अनिल भाईदास पाटील
5. एरंडोल – डॉ. सतिश पाटील
6. चाळीसगाव – राजीव देशमुख
7. पाचोरा – दिलीप वाघ
8. जामनेर – संजय गरुड
9. सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे
10. मुर्तिजापूर (अ.जा.) – रविकुमार राठी
11. हिंगणघाट – राजू तिमांडे
12. काटोल – अनिल देशमुख
13. हिंगणा – विजय घोडमारे
14. पुसद – इंद्रनिल मनोहर नाईक
15. किनवट – प्रदिप नाईक
16. लोहा – दिलीप शंकरअण्णा धोंडगे
17. वसमत – चंद्रकांत नवघरे
18. जिंतूर – विजय भांबळे
19. घनसावंगी – राजेश टोपे
20. बदनापूर (अ.जा.) – बबलू चौधरी
21. भोकरदन – चंद्रकांत दानवे
22. कळवण (अ.जा.) – नितीन पवार
23. येवला – छगन भुजबळ
24. सिन्नर – माणिकराव कोकाटे
25. निफाड – दिलीप बनकर
26. दिंडोरी (अ.जा.) – नरहरी झिरवळ
27. पंढरपूर - भारत भालके
28. फलटण - दीपक चव्हाण
29. वाई - मकरंद जाधव पाटील
30. कोरेगाव - शशिकांत शिंदे
31. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
32. पाटण - सत्यजीत पाटणकर
33. सातारा - दीपक पवार
34. दापोली - संजय कदम
35. गुहागर - सहदेव बेटकर
36. चिपळूण - शेखर निकम
37. रत्नागिरी - सुदेश मयेकर
38. सावंतवाडी - बबन साळगावकर
39. राधानगरी - के. पी. पाटील
40. कागल - हसन मुश्रीफ
41. इस्लामपूर - जयंत पाटील
42. शिराळा - मानसिंग नाईक
43. तासगाव-कवठे-महांकाळ - सुमन आर. पाटील
44. विक्रमगड (अ.ज) - सुनिल भुसारा
45. शहापूर (अ.ज) - दौलत दरोडा
46. मुरबाड - प्रमोद हिंदुराव
47. उल्हासनगर - भरत गंगोत्री
48. कल्याण पूर्व - प्रकाश तरे
49. मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड
50. विक्रोळी - धनंजय पिसाळ
51. दिंडोशी - विद्या चव्हाण
52. अणुशक्ती नगर - नवाब मलिक
53. श्रीवर्धन - अदिती तटकरे
54. जुन्नर - अतुल बेनके
55. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील
56. शिरूर - अशोक पवार
57. दौंड - रमेश थोरात
58. इंदापूर - दत्तात्रय भरणे
59. बारामती - अजित पवार
60. वडगाव शेरी - सुनिल टिंगरे
61. खडकवासला - सचिन दोडके
62. पर्वती - अश्विनी कदम
63. हडपसर - चेतन तुपे
64. अकोले (अ.ज) - डॉ. किरण लहामटे
65. कोपरगाव - आशुतोष काळे
66. शेवगाव - प्रताप ढाकणे
67. पारनेर - निलेश लंके
68. अहमदनगर शहर - संग्राम जगताप
69. कर्जत-जामखेड - रोहित पवार
70. गेवराई - विजयसिंह पंडित
71. माजलगाव - प्रकाश सोळंखे
72. बीड - संदीप क्षीरसागर
73. केज (अ.जा) - पृथ्वीराज साठे
74. परळी - धनंजय मुंडे
75. अहमदपूर - बाबासाहेब पाटील
76. उदगीर (अ.जा) - संजय बनसोडे
77. परांडा - राहुल मोटे

गुन्हे लपवणाऱ्यांना कोर्टाचा दणका, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा | सांगली | ABP Majha



राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी