Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून, 6 मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE: महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत चालणार आहे.

पार्श्वभूमी
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी सादर केला जाणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च 2026 या कालावधीत चालणार...More
एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरने केला आत्महत्येचा प्रयत्न
१० बिअर पिऊन आणि ४५ झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न
नर्ससोबत प्रेमसंबंध असल्याने नर्स वारंवार लग्नासाठी तगादा लावत असल्याने डॉक्टरांचा आत्महत्येचा प्रयत्न
डोंबिवली विष्णूनगर पोलिसांकडून तपास सुरु
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात काही वेळापूर एका डेमो कारला लागली आग....
आग लागण्याचे कारण अस्पष्ट...
या डेमो कार मध्ये २ व्यक्ती आणि १ कर्मचारी डेमो कार टेस्ट करत होते..
अग्निशमन दलांकडून आग विजवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.
- ब्रिटिश एअरवेजच्या विमानाची नागपूरात इमर्जन्सी लँडिंग
- ब्रिटिश एअरवेजच्या बोइंग 787 विमानाची नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
- लंडनहून हैदराबादला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड लक्षात आल्यावर नागपूरात लँडिंग
- विमानात एकूण 169 प्रवासी असल्याची माहिती
- हैदराबाद मध्ये खराब हवामानामुळे विमानाला लँडिंग ची परवानगी दिली नसल्याची माहिती
- पहाटे साडे पाचच्या सुमारास विमान नागपूरात सुखरूप उतरले
- विमानातील सर्व प्रवासी सुखरूप
नेहमी वादात राहिलेल्या केडीएमसीचा आणखीन एक कारनामा
वादग्रस्त युसूप हाईटस या इमारतीची फाईल गायब
केडीएमसच्या अभिलेखा विभागातून फाईल गायब झाल्याची धक्कादायक माहिती
युसूफ हाईटस ही बेकायदा इमारत असल्याने या
इमारती संदर्भात माहिती मागितल्यानंतर झाला खुलासा
इमारतीची फाईल गायब झाल्याने केडीएमसी अधिकारी ज्ञानेश्वर अडके यांनी कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
शिवसेना पक्षाच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शिवसेनेच्या दोन खासदारांची आंतरराष्ट्रीय मैत्री गटामध्ये नियुक्ती
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भारत - इंडोनेशिया संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी निवड
ऑपरेशन सिंदूर आउटरिच या सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते यशस्वी नेतृत्व
केंद्र सरकारने पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर दाखवला विश्वास
खासदार मिलिंद देवरा यांचा भारत - अमेरिका संसदीय मैत्री गटाचे सदस्य म्हणून समावेश
१८ व्या लोकसभेसाठी दोन्ही संसदीय मैत्री गटांची घोषणा
सदाभाऊ खोत - पुणे कृषी उत्पन्नबाजार समितीतील गैरव्यवहाराची चौकशी करा
जयकुमार रावल- चौकशी सुरू आहे
विक्रम काळे- दुसऱ्यांदा हा प्रश्न सभागृहात आला आहे. अर्धा तास चर्चा घेण्यात आली होती त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता परत आपण त्याचा कालावधी वापरला आहे. तिथ असणारे अतिक्रमण देखील काढण्यात आले नाही
जयकुमार रावल
आपण चौकशी DDR च्या माध्यमातून लावला होता. प्राथमिक अहवाल २८ तारखेला प्राप्त होईल आणि त्यानंतर कारवाई करू
- भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मालेगावात तणाव...
- नवनियुक्त महापौर व उपमहापौर यांच्यासह नगरसेविका व नगरसेवकांनी केले महापालिका प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन..
- किरीट सोमैया यांचा केला निषेध...
- सोमय्या यांच्या विरोधात दिल्या जोरदार घोषणाबाजी...
- सोमय्या राजकारणासाठी निर्माण करताहेत सामाजिक तेढ..
- सोमय्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या आयुक्तांची गाडी नगरसेवकांनी अडविली गाडी...
- हातात तिरंगा ध्वज घेत केला जोरदार विरोध...
गडचिरोली : सोमवारी राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आलाय. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची गडचिरोलीचे नवे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गडचिरोलीचे पालक सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती होती. आता राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची पालक सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने गडचिरोलीतील विकास कामांना आणखी गती मिळणार आहे. जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या प्रलंबित बाबी तातडीने सोडवण्यासाठी तसेच शासनाचे धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिव यांची नियुक्ती असते. शासनाचे निर्णय, धोरण जिल्हा स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालक सचिवांकडे असते. पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यात 3 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून 4 वेळा जिल्ह्यात दौरा करावा लागतो. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे, त्याचा अहवाल सादर करणे, येत असलेल्या अडचणींवर उपाय सुचवण्याचे काम पालक सचिव करत असतात.
चंद्रपूर महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचा उपमहापौर बसवला
मात्र हा निर्णय घेत असताना उद्धव ठाकरेंना न विचारता स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेतल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं
आता चंद्रपूर मधील जिल्हाप्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत
उद्धव ठाकरे या पदाधिकारी आणि नगरसेवकांवर कारवाई करणार का? कारण या उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती पदाधिकारी पक्षप्रमुखांसमोर मांडणार आहेत
- भाजपचे माजी खा.किरीट सोमैया आज मालेगाव दौऱ्यावर..
- दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आला बंदोबस्त...
- मालेगाव महापालिकेचे महापौर, उपमहापौर व सत्ताधाऱ्यांकडून सोमैया यांच्या दौऱ्याला विरोध होण्याची शक्यता..
- महापौर, उपमहापौर यांनी पत्रकार परिषद घेत सोमैया यांना विरोध करण्याचा दिला होता इशारा...
पार्थ पवार असणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार
सोमवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब
सुनील तटकरे,प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते
तसंच २६ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीत चर्चा झाली.
वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे, जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पंधरा दिवस उलटून गेले तरी देखील मुलीचा तपास लागत नाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या मुलीचे एका मुस्लिम तरुणाने अपहरण केले आहे. हिंदू धर्मातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव जिहाद सुरू आहे असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. या घटनेच्या निषेधार्थ सिन्नर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा विविध संघटनांकडून आणि सिन्नरवासीयांकडून काढण्यात येतोय. पोलिसांकडून चार पथक देखील या मुलीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे मात्र अद्याप मुलीचा आणि संशयित तरुणाचा शोध लागला नसल्याने हिंदू संघटना आक्रमक भूमिकेत आहे... अधिवेशनाच्या दरम्यान सरकार विरोधात हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत उत्तम आहे
उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे
छातीत इन्फेक्शन झालं होतं थोड... ते पूर्णपणे कव्हर झाला आहे
त्यामुळे उद्या सकाळी त्यांना सोडलं जाईल
आणि अफवांवर विश्वास ठेवू नका ..
शरद पवार यांची तब्येत ठीक आहे उद्या सोडल्यानंतर थोड्या दिवसांनी प्रवास करू शकतात अशी माहिती डॉक्टर परवेझ ग्रँड यांनी दिले आहे
महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात
बैठकीमधे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर कोणत्या विषयांवर आंदोलन करायचं याबाबत चर्चा
मंत्री नरहरी झिरवळ राजीनामा, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती
बैठकीला कॉंग्रेसचे विजय वड्डेटीवार, सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित
सध्या ठाकरेंच्या सेनेच बैठकीला कुणीही हजर नाही
पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वरील वाहतुक कोंडीवर जयंत पाटील विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार
32 तास वाहतुक कोंडी आणि त्यानंतर पुन्हा होणारी वारंवार वाहतुक कोंडी यावर स्थगन प्रस्ताव आणणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर.
नदी प्रदूषणाकडे लक्ष न दिल्याने कोल्हापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घातले कोंडून..
कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड या ठिकाणी प्रदूषण मंडळाचे अधिकारी मातकर यांना तब्बल सहा तास कोंडून घातलं.
अकिवाटे इंडस्ट्रीचे प्रदूषित पाणी कृष्णा नदीत सोडल्याने अर्जुनवाड गावातील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना कोंडून घातले
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात वाढत्या पाणीपातळीमुळे 12 व्या शतकातील कमळजा माता मंदिर धोक्यात आले आहे. देवीच्या मूर्तीच्या डोळ्यापर्यंत पाणी पोहोचल्याने भाविकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी दोन दिवसापासून लोणार तहसील कार्यालयासमोर भाविकांनी बेमुदत सामूहिक उपोषण सुरू केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.. आता प्रशासन तत्काळ पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
अवकाळी,गारपिटीमुळे ज्वारीचे मोठे नुकसान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची व्यक्त केली भावना
तिकडे बीडच्या वैजवाडी शिवारामध्ये काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यतः ज्वारीचे अक्षरशः भूई सपाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.आधीच अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासमोर पुन्हा एकदा नवीन संकट उभा ठाकले आहे.काल झालेल्या अतिवृष्टीमुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.पाच एक्करमध्ये ज्वारीच्या पेरणीसाठी 60 ते 70 हजार रुपये खर्च केला होता यातून शेतकऱ्याला दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न झाले असते मात्र आता गारपिटीमुळे सगळेच गेले असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलंय.अद्याप पंचनासाठी कुणीही आले नसल्याचे देखील शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
मुंबईचा कांदिवली पूर्वेत ट्रांसजेंडर टोळीचा आतंक
कांदिवली परिसरात ट्रांसजेंडर टोळी कडून सर्रासपणे नागरिकांचे बळजबरीने केला जात आहे घर खाली
ट्रांसजेंडर टोळीचा बळजबरीने घर खाली करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हायरल व्हिडिओ प्रकरणी समता नगर पोलिसांनी तीन ट्रांसजेंडर टोळी विरुद्ध गुन्हा दाखल केली आहे
व्हायरल व्हिडिओ कांदिवली पूर्वेत जानू पाडा परिसरातील आहे
कांदिवली जानू पाडा परिसरात राहणारा एका व्यक्तीने पहिली पत्नीला सोडून दुसरी पत्नी सोबत राहत होता
पहिली पत्नीने ट्रांसजेंडर टोळीला घेऊन त्या व्यक्तीचा आई-वडील राहत असलेल्या घरामध्ये बळजबरीने सामान बाहेर काढून घर खाली केले
घरामध्ये असलेले त्या व्यक्तीचे आई-वडील या टोळी कडे रिक्वेस्ट करत होते आणि रडत होते मात्र या टोळी ने त्यांना घरातून हाकलून लावलं
यानंतर समता नगर पोलिसांनी याप्रकरणी बळजबरीने घर खाली करणारे ट्रांसजेंडर टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करून या सर्व आरोपीचे धरपकड सुरू केली आहे
या टोळीने यापूर्वी किती जणांचा घर बळजबरीने खाली केला आहे त्यासोबत यांच्याविरुद्ध अजून कुठे कुठे गुन्हा दाखल आहे या सर्व संदर्भात अधिक तपास समतानगर पोलीस करत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली नेत्यांची बैठक
११ वाजता शिवतीर्थ येथे बोलावली बैठक
मागच्या आठवड्यात रंगशारदा येथे घेतलेल्या मेळाव्यात बैठकीत होणार चर्चा
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी नेत्यांवर दिली असल्याने याबाबत पाठपुरावा करण्याबद्दल राज ठाकरे आदेश देण्याची शक्यता
सोबतच मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा
येत्या २६ तारखेपासून दादरच्या शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मनसेचा कार्यक्रम
अभंग रीपोस्ट या लोक कलेचा कार्यक्रम होणार
गडचिरोली : आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची.... गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरामध्ये एलटीबी बेव्हरेजेस या कंपनीच्या प्रस्तावित मोह फुलापासून दारूच्या कारखान्यासाठी गडचिरोलीत 9 मार्च रोजी जन सुनावणी आयोजित करण्यात आली होती. दरम्यान जनभावना लक्षात घेता 'एबीपी माझा'ने मोहापासून दारूचाच मोह का, असे वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रदूषण नियमक मंडळ चंद्रपूरने 9 मार्च रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जन सुनावणी स्थगित केल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. या जनसुनावलीवर अनेक नागरिकांचा आक्षेप आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ही जन सुनावणी स्थगित करण्यात येत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रात म्हटले आहे.
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: गडचिरोली : राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आलाय. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची गडचिरोलीचे नवे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गडचिरोलीचे पालक सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती होती. आता राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची पालक सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने गडचिरोलीतील विकास कामांना आणखी गती मिळणार आहे. जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या प्रलंबित बाबी तातडीने सोडवण्यासाठी तसेच शासनाचे धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिव यांची नियुक्ती असते. शासनाचे निर्णय, धोरण जिल्हा स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालक सचिवांकडे असते. पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यात 3 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून 4 वेळा जिल्ह्यात दौरा करावा लागतो. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे, त्याचा अहवाल सादर करणे, येत असलेल्या अडचणींवर उपाय सुचवण्याचे काम पालक सचिव करत असतात.
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE: अंबादास दानवे यांनी एक ट्वीट करुन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारले आहेत. अंबादास दानवे ट्वीटमध्ये म्हणालेत की, "पर्यटनमंत्री शंभूराज देसाई जी, महाराष्ट्राचा नकाशा 'सातारा' जिल्ह्यापाशीच संपतो का? सरकार स्थापन झाल्यापासून मराठवाड्याच्या पर्यटनासाठी आपल्याला एकदाही मुहूर्त सापडला नाही! साताऱ्यात तालुक्यांपेक्षा जास्त महोत्सवांची खैरात आणि 29 कोटींची उधळण, मग जागतिक वारसा स्थळे असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील 'एलोरा फेस्टिव्हल'ला छदाम नाही, ही अशी परवड का? हा मराठवाड्याच्या कला-संस्कृतीचा अपमान नाही का? कधीतरी जिल्ह्याबाहेर पडून इकडेही आढावा घेण्याचे कष्ट घ्या! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 'हजारो कोटींच्या बजेट माझ्याकडे' अश्या गप्पा मारणारे छत्रपती संभाजीनगरचे मंत्री तरी काय करतात?"
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE: राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना ही कंत्राटदारांना चेक दिल्याचा आरोप
जवळपास 89 हजार कोटी रुपये कंत्राटदाराचे थकल्याचा कंत्राटदार संघटनांचा आरोप
विरोधक, प्रसारमाध्यमे यांनी टिका केल्यानंतर कंत्राटदारांना चेक सरकारने दिले
मात्र चार महिने उलटून गेले तरी ही खात्यात पैसे वर्ग न झाल्याचा कंत्राटदार संघटनांचा आरोप
एवढी थकबाकी असताना ही निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर नवीन कामांना मान्यता देण्यात आली
या संदर्भात 9 मार्चला मुंबईत सर्व कंत्राटदार संघटनांची बैठक होणार आहे
यात बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना ही कंत्राटदारांना चेक दिल्याचा आरोप
जवळपास 89 हजार कोटी रुपये कंत्राटदाराचे थकल्याचा कंत्राटदार संघटनांचा आरोप
विरोधक, प्रसारमाध्यमे यांनी टिका केल्यानंतर कंत्राटदारांना चेक सरकारने दिले
मात्र चार महिने उलटून गेले तरी ही खात्यात पैसे वर्ग न झाल्याचा कंत्राटदार संघटनांचा आरोप
एवढी थकबाकी असताना ही निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर नवीन कामांना मान्यता देण्यात आली
या संदर्भात 9 मार्चला मुंबईत सर्व कंत्राटदार संघटनांची बैठक होणार आहे
यात बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार
बाईट- मिलिंद भोसले, अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना
Badlapur IVF Racket : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर येथे उघडकीस आलेल्या महिलांच्या बीजांड (Oocytes) विक्री रॅकेट प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे.
बदलापूर येथील जोवेली परिसरात पोलीस कारवाईदरम्यान आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या शरीरातून कृत्रिमरीत्या बीजांड काढून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे संघटित रॅकेट उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेला मानवी तस्करीचा आणि महिलांच्या प्रजनन अधिकारांवरील गंभीर आघाताचा स्वरूप असल्याचे त्यांनी नमूद केले.
MAHA Budget Session LIVE: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल दोन्ही सभागृहात अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अनेक नेते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आज मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरण तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून आज झिरवाळांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. तसंच झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सभागृहात प्रश्नोत्तरे आणि तारांकित प्रश्नानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होणार आहे.
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. लाचखोरीच्या प्रकरणावरुन मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात विरोधक आंदोलन करणार. तर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होणार आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून, 6 मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प