Monsoon News : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी वाट बघत आहेत. काल संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. अशातच संपुर्ण जुलै महिन्यात मान्सून देशात सरासरी इतका अपेक्षित आहे. परंतू, महाराष्ट्रात मात्र तो सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता 45 टक्के जाणवत असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे. हवामानाच्या संदर्भात माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे.
'ला' निना संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत आहे. ही देशासाठी जमेची बाजू दिसत असली तरी भारतीय महासागर द्वि-ध्रुविता मात्र संपूर्ण पावसाळ्यात नकारत्मेकडे झेपावत आहे. पावसासाठी ही एक प्रतिकूलताही जाणवत आहे. यामुळं कमी पाऊस आणि पावसाचे खंडही जाणवू शकतात, अशी शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितलं. अर्थात हे संपूर्ण देशाच्या पाऊस वितरणासाठी लागू आहे.
माणिकराव खुळे यांनी मांडलेले मुद्दे
- सोमवारपासून (4 जुलै) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्रनिर्मिती अपेक्षित असून पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होईल. त्याच्याशी निगडीत परिणामामुळं 4 जुलै ते 6 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसास सुरुवात होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. .
- मुंबईसह कोकण आणि गोव्यात तर दमदार पाऊस चालूच आहे, पुढेही तो चालणारच आहे. मोसमी पावसाच्या या एक अरबी समुद्रीय शाखेसाठी म्हणजेच मध्य महाराष्ट्रातील 10, मराठवाड्याच्या पश्चिमकडील 4 जिल्ह्यांसाठी सध्या तरी ही उत्तमच अनुकूलता समजावी असेही खुळे यांनी म्हटलं आहे.
- संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा, कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि पारनेरसह सभोवतालच्या भागात सध्या तरी विखुरलेल्या स्वरुपातच मध्यमच पावसाचीच शक्यता दिसते.
- नैऋत्य मान्सूननं त्याच्या 8 जुलै या सरासरी तारखेच्या सहा दिवस अगोदरच म्हणजे आज संपूर्ण देश काबीज केला आहे. त्याबरोबर मान्सून ट्रफ स्थापित केला आहे.
- बंगला उपसागरात अपेक्षित कमी दाब क्षेत्रनिर्मिती यामुळं देशात मान्सून (पूर्व-पश्चिम) ट्रफचे स्थापित झाला असून आज तो उत्तरेकडेच असून सध्या तो राजस्थानच्या बिकानेर अलवर तर उत्तर प्रदेशमधील हरडोई तसेच झारखंडमधील डालटणगांज आणि पश्चिम बंगालमधील शांतीनिकेतनमधून जात आहे.
- देशाच्या मध्य भूभागावर यापुढं नेहमी झळकणाऱ्या मान्सून ट्रफच्या दक्षिणोत्तर दोलनावरच देशातील मोसमी पावसाचे वितरण, दिशा, प्रगती, तीव्रता व ओढ या गोष्टींची सुस्पष्टता ठरेल.
थोडक्यात मोसमी पाऊस हे जर एक वाहन मानले तर 'मान्सून ट्रफ' हे त्याचे स्टिअरिंगं समजावे. - पुर्वोत्तरेकडील 7 राज्ये, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा येथे पडत असलेल्या पावसास गेल्या 3 दिवसात देशात फेज 2 व 3 मध्ये कार्यरत असलेल्या एमजेओ सायकलची काहीशी मदत झाली आहे. तो सध्या फेज 4 मध्ये गेला असून म्हणजेच त्याचा मेरिटाईम कॉन्टी्नेंटमध्ये प्रवेशित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या: