एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Thane Maharashtra Corona Update: ठाण्यात कोरोनाची स्थिती गंभीर; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महापालिकेला सूचना

मागील वर्षी पेक्षा यावेळेस कोरोना संक्रमणाचे प्रमाण हे जलदगतीने होत आहे. रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद करीत सर्व प्रशासन यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी देखील सक्षमपणे काम करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे : कोविड 19 ची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णंसख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने सज्ज रहावे अशा सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत दिलेत. त्याचबरोबर ठाणे ग्लोबल कोविड हॅास्पीटल आणि पार्किंग प्लाझा रूग्णालय येथे तातडीने सीटीस्कॅन सुविधा सुरू करण्याचे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले आहेत. 

कोविडच्या इतर रूग्णांबरोबरच कोविडची लागण झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था तसेच सहव्याधी रूग्णांची काळजी घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देतानाच मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचा नियमित आढावा घेवून अशा रुग्णांच्या हातावर शिक्का मारुन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि जास्तीत संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होतील या दृष्टीने महापालिकेने कटाक्षाने कार्यवाही करावी अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

मागील महिन्याभराच्या काळामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर नरेश म्हस्के यांनी बैठकीचे आयोजन केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस खासदार राजन विचारे, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृहनेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, आरोग्यसमिती सभापती निशा पाटील, माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अध्यक्ष भूषण भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक गुरमुखसिंग स्यान, नारायण पवार, सुनेश जोशी उपस्थित होते. तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, विश्वनाथ केळकर, वर्षा दिक्षीत, अश्विनी वाघमळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू मुरूडकर, आरोगय अधिकारी अनिरुध्द माळगांवकर, डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.

मागील वर्षी पेक्षा यावेळेस कोरोना संक्रमणाचे प्रमाण हे जलदगतीने होत आहे. रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद करीत सर्व प्रशासन यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी देखील सक्षमपणे काम करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. याकामी सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर सर्व ताकदीनिशी कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. या सेंटरवर आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्स, औषधसाठा, रेमडेसिवीर व आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचित केले. याचबरोबर लसीकरण केंद्रे वाढवून जास्तीत जास्त लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी मनुष्यबळाची संख्या वाढवावी. तसेच होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांवर शिक्के मारुन तो रुग्ण घराबाहेर पडणार नाही याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करण्यात यावी यासाठी तज्ज्ञ डॉक्टर सज्ज करण्यात यावेत. यापूर्वी कार्यान्वित केलेली विलगीकरण कक्ष सज्ज करुन या ठिकाणी दैनंदिन साफसफाई, आवश्यक औषधपुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर्स, भोजनाची व्यवस्था होईल या दृष्टीने प्रशासनाने काम करावे. 

तसेच ज्या विभागात रुग्ण सापडत आहेत, तेथील नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी होर्डिंग्ज लावणे, कोरोनाबाधित रुग्णांना मदत व्हावी यासाठी शहरातील होर्डिंग्जवर कोविड वॉर रुमचे दूरध्वनी क्रमांक देवून संपर्क साधण्याचे आवाहन करावे. ठाणे महापालिकेचा कोविड वॉर रुम हा अद्ययावत असून रुग्णांना संपर्क साधल्यास तात्काळ सेवा पुरविली जाते. परंतु, रुग्णांनी या वॉर रुमपर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले. अत्यंत चांगल्या प्रकारे ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहिम चालू असून लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, प्रभागनिहाय सर्वच लोकप्रतिनिधी चांगल्याप्रकारे काम करीत असून यापुढे देखील समन्वयाने करावे असे देखील महापौर यांनी यावेळी नमूद केले. तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना त्वरीत उपलब्ध होईल या दृष्टीने देखील स्वतंत्र डेस्क तयार करण्याबाबतही महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला सूचित केले.

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सर्व विभागांमध्ये दैनंदिन साफसफाई योग्यप्रकारे करणे, आवश्यकतेनुसार औषधफवारणी करणे तसेच जे नागरिक मास्क वापरत नाही. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे, वेळप्रसंगी पोलीसांची मदत घेणे तसेच रात्री 8 नंतर लागू संचारबंदीचे पालन होत आहे की नाही यासाठी गस्त वाढविणे, आवश्यकतेनुसार मार्शलची नियुक्ती करण्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या.

कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी दाखल करता यावे रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, आवश्यकतेनुसार परिवहनच्या बसेसचे रुग्णवाहिकेत परिवर्तीत करणे, तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची सीटीस्कॅन करण्यासाठी ग्लोबल कोविड सेंटर, पार्किंग प्लाझा येथे सीटीस्कॅनची मशीन उपलब्ध करणे, जेणेकरुन रुग्णांना इतरत्र जावे लागणार नाही व रुग्णांवर योग्य उपचार करणे सोईचे होईल या दृष्टीने कार्यवाही करावी आदी सूचना देत असतानाच या सूचनांची अंमलबजावणी देखील तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्लाAjit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझाMahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Embed widget