Maharashtra Weather Update: सध्या बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने मध्यप्रदेश छत्तीसगड सह विदर्भातही पावसाचा अलर्ट आहे .गेल्या आठवड्यात उष्णतेच्या तीव्र लाटेला विदर्भातील नागरिकांना सामोरे जावं लागलं .मात्र आज पासून पुढील दोन ते तीन दिवस विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज (20 मार्च) बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे .तसेच उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे . उद्या विदर्भातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय . (IMD forecast)
दरम्यान मराठवाडा वगळता कोकण मध्य महाराष्ट्र सामान्य तापमानाची नोंद झाली .मराठवाड्यात 38ते 40 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते . आज बीडमध्ये 40.8 अंश सेल्सिअस तापमान होते . तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअसची नोंद झाली .परभणी 39.9 लातूर 38.3 धाराशिव 39 अंश सेल्सिअस तापमान होते . विदर्भात अकोला अमरावती आणि वर्धा 40 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद झाली . त्यामुळे नागरिकांना बसणारा उन्हाचा चटका कायम असल्याचेच दिसत आहे . दरम्यान हवामान विभागाचे पुणे येथील प्रमुख के एस होसळीकर यांनी मराठवाड्यात संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे .
हवामान विभागाचा अंदाज काय ?
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या तीन दिवसात कमाल तापमानात फारसा बदल नाही .किमान तापमान मात्र दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचे सांगण्यात आलंय . हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा दिलाय . दरम्यान तापमानात फारसा बदल नसल्याने नागरिकांना दिवसभर कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागतोय .मराठवाडा सह विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे .त्यामुळे कमाल तापमान काही अंशी घसरले असले तरी कमाल तापमान सामान्य ते सामान्य होऊन अधिक राहण्याचे शक्यता आहे .
आज कुठे किती तापमान ?
आज दिनांक 20 मार्च रोजीबहुतांश ठिकाणी सामान्य तापमानाची नोंद झाली . अकोला - 41.1°से | अमरावती - 40.2°से | वर्धा - 40.2°से | सोलापूर - 40.8°से | बीड - 40.2°से | परभणी - 39.9°से | यवतमाळ - 39.5°से | वाशिम - 39.8°से | चंद्रपूर - 40.0°से | गडचिरोली - 39.2°से | नागपूर - 39.2°से | जळगाव - 37.8°से | धुळे - 36.3°से | नंदुरबार - 38.5°से | नाशिक - 36.3°से | अहमदनगर - 38.9°से | औरंगाबाद - 39.0°से | लातूर - 38.3°से | सातारा - 38.7°से | सांगली - 38.5°से | पुणे - 38.7°से | पालघर - 32.8°से | ठाणे - 36.0°से | मुंबई उपनगर - 32.4°से | मुंबई शहर - 32.0°से | रायगड - 32.6°से | रत्नागिरी - 31.7°से | सिंधुदुर्ग - 32.0°से | गोंदिया - 37.0°से | भंडारा - 38.0°से | बुलढाणा - 38.2°से | चंद्रपूर - 40.0°से | उस्मानाबाद - 39.0°से
हेही वाचा: