एक्स्प्लोर

नाशिक पदवीधरमध्ये 16, नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात, मराठवाड्यात बंडखोरी; पाचही मतदार संघाच्या लढती ठरल्या 

Maharashtra Election: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता.

Maharashtra Election: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती येथील निवडणुकीतं चित्र स्पष्ट झालेय. मराठवाड्यात बंडखोरी चर्चेत आहे, तर नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. पाचही मतदार संघाची स्थिती पाहूयात... आजपासून खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात 16 जणांमध्ये लढत - 

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी  अर्ज मागे घेतले आहेत.  16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवणुकीतून माघार घेतली आहे.  आजच्या माघारीनंतर नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत तांबे-पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी असतानाही तत्कालीन आमदार सुधीर तांबे यांनी कुटुंबाच्या आग्रहाचे कारण पुढे करून भाजपच्या संपर्कात असलेल्या पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र काँग्रेस पक्षाने पक्षभंगाची कारवाई केल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात आले. भाजपने देखील ऐनवेळी पर्यंत इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांना वेटिंगवर ठेवत अधिकृत उमेदवारी जाहीर केली नाही. त्यांनी देखील अपक्ष फॉर्म रिंगणात उतरल्या. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.


अमरावती पदवीधर निवडणूक 23 जणांमध्ये लढत -

अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी 10 उमेदवारांनी आपला अर्ज माघार घेतला. 
भाजप, माविआ, वंचित आणि आपचे उमेदवार रिंगणात आहेत. पण भाजपचे उमेदवार डॉ रणजीत पाटील आणि माविआचे धीरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. आज पासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात झाली आहे. 30 जानेवारी रोजी मतदान तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 


नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ कुणामध्ये लढत? 

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 27 अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता 22 उमेदवार रिंगणात आहे...

त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार उमेदवार म्हणजे

1) नागो गाणार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार... भाजपचा त्यांना पाठिंबा...

2) सुधाकर अडबाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार... ( हे काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांची पसंती असल्याचे बोलले जात आहे.. मात्र काँग्रेसने अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही...)

3) राजेंद्र झाडे, कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचे उमेदवार ( यांनीही काँग्रेसचा पाठिंबा मागितला होता.. मात्र काँग्रेस नेत्यांकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे)

4) सतीश इटकेलवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळालेला नाही.

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात 

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक  निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी  2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी  अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत  छाननी दरम्यान एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात  आले होते.  त्यापैकी 1) कडू वेणुनाथ विष्णु, अपक्ष  2) घोन्साल्वीस जिमी मतेस, अपक्ष 3) बळीराम परशुराम म्हात्रे, अपक्ष 4)  बाळाराम गणपत पाटील, अपक्ष,  5) ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे, अपक्ष,  या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जागे घेतले आहेत.
 
म्हात्रे ज्ञानेश्वर बारकु,  भारतीय जनता पार्टी, 2) धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), 3) उस्मान इब्राहिम रोहेकर, अपक्ष, 4) तुषार वसंतराव भालेराव,अपक्ष, 5) देवरुखकर रमेश नामदेव, अपक्ष 6) बाळाराम दत्तात्रेय पाटील, अपक्ष, 7) प्रा.सोनवणे राजेश संभाजी, अपक्ष, 8) संतोष मोतीराम डामसे, अपक्ष  असे आहेत.  कोकण विभाग शिक्षक  मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे.


औरंगाबादमध्ये 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात -

निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी एकुण 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते. नामनिर्देशनपत्र छाननी नंतर सर्व 15 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र वैध ठरले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांपैकी 01 उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Marathwada Teacher Constituency Election) दाखल करण्यात आलेल्या अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असताना देखील, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अखेर बंडखोरीचा ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले. 


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget