Maharashtra SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा (Maharashtra SSC Result 2025) निकाल आज मंगळवारी (दि. 13) दुपारी जाहीर झाला आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजता मंडळाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या व इतर अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल. आज (मंगळवारी) अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षांनी शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला. महाराष्ट्राचा 10 वीचा निकाल 94.10 % टक्के लागला आहे. यात पुणे विभागाचा निकाल 94.81 टक्के निकाल लागला आहे. या वर्षी देखील कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. यंदाही राज्यात मुलींची बाजी मारली आहे. (Maharashtra SSC Result 2025)

Continues below advertisement

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षांनी शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 62 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात आले. कॉपी असणाऱ्या केंद्रावर केंद्रसंचालक, शिक्षक बदलून दिले. 37 केंद्रांवर गैरप्रकार घडले आहेत. त्या केंद्राची मान्यता कायमची बंद करण्यात येणार असा निर्णय झाला आहे. पुणे, नागपूर,छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15,58020 नोंदी केली, 15,46579 परीक्षा दिली, पैकी 14,55433 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारीची आकडेवारी 94.10 टक्के इतकी आहे. (Maharashtra SSC Result 2025)

एकूण 9 विभाग निहाय निकाल

पुणे -94.81 टक्के नागपूर- 90.78 टक्केसंभाजीनगर- 92.82 टक्केमुंबई-95.84 टक्केकोल्हापूर- 96.78 टक्के अमरावती-92.95 टक्केनाशिक- 93.04लातूर-92.77कोकण- 99.82

Continues below advertisement

निकालाची वैशिष्ट्ये- 

-एकूण 63 विषय त्यापैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के - 23489 शाळांपैकी 7,924 शाळांचा निकाल 100 टक्के - ⁠100 टक्के निकाल 200 विद्यार्थी

100 टक्के मिळालेले विद्यार्थी 211

पुणे -13नागपूर-3संभाजीनगर-40मुंबई-8कोल्हापूर-12अमरावती-11नाशिक-2लातूर-113कोकण-9

राज्यातील 285 विद्यार्थी काठावर पास

पुणे -59नागपूर-63संभाजीनगर-26मुंबई-67कोल्हापूर-13अमरावती-28नाशिक-9लातूर-18कोकण-0

कुठे पाहता येईल निकाल?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही घेता येईल. शाळांना https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI