दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
1. एसटीचा संप मिटवण्यासंदर्भात मोठं पाऊल, अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव, परिवहन मंत्री आणि शिष्टमंडळाची आज बैठक
2. खासगी क्रिप्टो करन्सीला चाप लावून आरबीआयच्या डिजिटल चलनासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक, कृषी कायदा रद्द करणारं विधेयकही पटलावर मांडणार
3. गाफील ठेवण्यात आल्यानं सातारा जिल्हा बँकेत पराभव, शरद पवारांसोबतच्या मंथनानंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
4. आजपासून मुंबई लोकलसाठी यूटीएस अॅपवरुन तिकीट मिळणार, युनिव्हर्सल पासच्या लिंकशी यूटीएस अॅपचं सलग्नीकरण
5. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, आरोपीला राज्यस्थानमधून अटक
Honey Trap Shivsena MLA : हनी ट्रॅपच्या माध्यमातून प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असणाऱ्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर क्राईम विभागाकडून याचा तपासही सुरु आहे. मात्र, हे प्रकार थांबायचं नाव घेत नाही. आता शिवसेना आमदाराला हनी ट्रॅपच्या (Honey Trap Case) माध्यमातून गंडा घालणाचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Shiv Sena MLA Mangesh Kudalkar) यांना फोन वरुन पैशाची मागणी करण्यात आली. कुडाळकर यांनी त्वरित सायबर सेलकडे (Mumbai Cyber Police) याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ऑनलाईन पैसे टाकायला सांगितले त्यावरुन आरोपीला ट्रॅक करणं सोपं झालं आणि मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या टीमने सिकरी, राजस्थान येथून मोसमुद्दीन नावाच्या आरोपीला अटक केली आहे, या प्रकरणात पोलीस तपास करून आणखी काही आरोपींना अटक करू शकतात.
6. मराठा आरक्षणावरून संभाजीराजे अक्शन मोडमध्ये, पुणे ते मुंबई लॉन्ग मार्चचा दिला इशारा
7. अमरावतीकरांना संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु, रात्रीची संचारबंदी कायम
8. अल्पवयीन मुलांसोबत ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही, अलाहाबाद हायकोर्टाचा धक्कादायक निर्णय
9. शेतकऱ्यांविषयीचं वादग्रस्त वक्तव्य कंगना रनौतला भोवलं, खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
10. न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिकेला के.एल राहुल मुकणार, सूर्यकुमार यादवला मिळाली संधी
Ind vs NZ 1st Test: न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय. दुखापतीमुळं भारताचा सलामीवीर केएल राहुल कसोटी मालिकेतून बाहेर झालाय. याबाबत बीसीसीआयनं माहिती दिलीय. त्याच्या जागेवर भारताचा युवा खेळाडू सुर्यकुमार यादवला संधी देण्यात आलीय.