Tanaji Sawant : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप आणि इतर पक्षातील नेते वारंवांर काही ना काही गौप्यस्फोट करत आहेत. अशातच आता राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांनी देखील एक गौप्यस्फोट केला आहे. बंडासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याबरोबर मी तब्बल दीडशे बैठका केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात झाल्याचा गौप्यस्फोट तानाजी सावंतांनी केला आहे. परंडा शहरात कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात सावंत बोलत होते.


बंडासाठी आमदाराचं काऊन्सलिंग मी केलं


राज्यात सत्तांतरासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर अनेक बैठका केल्या आहेत. या बंडासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील आमदाराचं मी काऊन्सलिंग करत होतो. या सर्व गोष्टी मी सांगून करत होतो. कुठलीही गोष्ट झाकून केली नाही असेही सावंत यांनी सांगितलं. सावंत यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.


मी जे बोलतो ते करुन दाखवतो 


राज्यात  2019 ला महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर सत्ता बदलायचे आमचे कामचे काम सुरु होते. आम्ही आमदाराचं कौन्सलिंग करत होतो. एकनाथ शिंदे (Eknath shinde)  आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 100 ते 150 बैठका झाल्याचे तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant)म्हणाले. त्यावेळी आमचे तत्कालीन पक्षप्रमुखांना मला मंत्रीमंडळातून बाजूला ठेवले होते. पण मी जे बोलतो ते करुन दाखवतो हे तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल असंही तानाजी सावंत म्हणाले. 30 डिसेंबर 2019 ला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर 3 जानेवारीच्या दरम्यान सुजितसिंह ठाकूर मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी करुन शिवसेना-भाजपचा जिल्हा परिषद आणली. धाराशीव जिल्ह्यातून याची सुरुवात झाल्याचे तानाजी सावंत म्हणाले. तेव्हापासूनच मी बंडाचं निशाण फडकावले होते. ज्यांना इशारा द्यायचा होता त्यांना दिला असेही सावंत म्हणाले.


परत मातोश्रीची पायरी चढणार नसल्याचे सांगितले


मातोश्रीवर जाऊन मी परत मातोश्रीची पायरी चढणार नसल्याचे सांगून आलो होतो असेही तानाजी सावंत म्हणाले. सरकार उलथवून टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नव्हतो आणि त्याची प्रचिती आल्याचे तानाजी सावंत म्हणाले. बंडासाठी मी दीडशे बैठका घेतल्याचा खुलासा सावंतांनी आज केला. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानेच हे बंड झाल्याचे तानाजी सावंत म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:  


Eknath Shinde : अन्यायाविरोधात बंड केलं, आता माघार नाही; एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे