Maharashtra School :  ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं आजपासून राज्यभरातली कॉलेज पुन्हा सुरु होणार आहेत. नागपूर, पुणे, सोलापूर, वाशिमसह अनेक जिल्ह्यातल्या शाळांची घंटाही आजपासून वाजणार आहे. 


नागपूर ग्रामीण भागातील 1 ते 12 वर्गाच्या शाळा उघडणार 
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भात आज आदेश काढत उद्या १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या अनेक भागात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यामध्ये देखील शाळा सुरू करण्याबाबत मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने विविध पातळीवर शाळा व पालक यांचे मनोगत जाणून घेतले आहे.टास्क फोर्स कडूनही बाधित संख्या कमी होईल, असे संकेत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.     तथापि, शाळा सुरू करतांना सर्व वर्ग स्वच्छ व निर्जंतूककिकरण करण्याविषयी सूचना करण्यात आली आहे. पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घ्यायचे आहे. शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असणे आवश्यक आहे.कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना बैठक व्यवस्थेतही करण्याबाबतचे निर्देशित करण्यात आले आहे. याशिवाय परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते ते टाळणे बाबतही निर्देशित करण्यात आले आहे. मास्कशिवाय शाळेतील प्रवेश वर्जित करण्यात आला असून प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दोन डोस आवश्यक करण्यात आले आहे.


पुणे जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू


पुणे जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. पहिली ते आठवीची शाळा चार तास असणार आहे. शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार आहे. शाळेची वेळ फक्त चार तास असून विद्यार्थ्यांनी नाश्ता करून यायचं आहे. त्यानंतर जेवण घरी जाऊन करायचं आहे. दर रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात याव्या असे आदेश देण्यात आले आहेत.


वाशिम जिल्ह्यातील 9वी ते 12वी पर्यंत च्या  शाळा  महाविद्यालय उद्या पासून सुरू करण्याचा निर्णय  जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.  सरकारने घालून दिलेले नियम पाळून  शाळा महाविद्यालय सुरू केले जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.



सोलापूर शहरातील शाळा आजपासून सुरु
सोलापूर शहरातील शाळा आजपासून सुरु होणार आहेत.सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिलीय.   कोरोना नियमांचं पालन करुन सोलापूर महापालिका क्षेत्रातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत. 


 धुळे जिल्ह्यात आजपासून पहिली ते आठवीच्या शाळा सुरु
 धुळे जिल्ह्यात कालपासून पहिली ते आठवीच्या शाळा सुरु झाल्या. काल पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला. यावेळी शासनाच्या नियमांचं पालन करत विद्यार्थ्यांची थर्मामिटरने तपासणी करून त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला.  जिल्हा प्रशासनाने आठवड्यातून तीन दिवस शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असून टप्प्याटप्प्याने विद्यार्थी संख्या वाढवण्यात येणार आहे, तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण देखील करण्यात येणार असून शाळा पुन्हा सुरू झालेले विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.


चंद्रपुरात कालपासून पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली असून नववी ते 12 वी पर्यंतचे वर्ग आज पासून सुरू करण्यात आलेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जानेवारीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील शाळा सरसकट बंद करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसात प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होणारी रुग्णसंख्या कमी असल्याने जिल्हा प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोशल डिस्टसिंग - थर्मल स्क्रिनिंग- सॅनिटायझेशन आदी काळजी घेत विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शाळा पुन्हा सुरू झाल्यानं विद्यार्थांनी आनंद व्यक्त केला.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI