Maharashtra Rain LIVE: मुंबईत पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; तर पुढील दोन दिवसांत विदर्भात पावसाचा जोर वाढणार
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... Mankhurd Chawl Collapse : धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ...More
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या दोन गटांमध्ये फ्रीस्टाइल पद्धतीने लाठ्या काठ्या , तसेच कुऱ्हाडीने एकमेकांवर हल्ले झाल्याची घटना घडली आहे. चंद्रभागा नदीवरील जुन्या दगडी पुलावर ही हाणामारी झाल्याची घटना घडली. 2 गटात झालेल्या हल्ल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र स्थानिकांनी मध्यस्थी करत हा गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
रत्नागिरीतील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा सुमारे ५० ते ६० फूट भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नुकतेच स्थानकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाचा ठेका खासगी कंपनीला देण्यात आला होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही या छताला गळती लागल्याच्या तक्रारी होत्या. आता छताचा भाग कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणेकडून घटनेची चौकशी सुरू आहे.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे इंद्रायणीने धोका पातळी ओलांडली आहे. हे सर्व पाणी भीमा नदीला येऊन मिळत असून सध्या दौंड बंधाऱ्यातून 27 हजार 847 क्युसेकने भीमा नदी पात्रात पाण्याचा प्रवाह येत आहे. ज्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरामध्ये गार्डन मधली शेड कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी
पुष्पांजली गार्डन मध्ये असलेल्या योगा केंद्राचे शेड कोसळून एक व्यक्ती जखमी
जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी जवळचे रुग्णालय मध्ये दाखल
घटना कशामुळे घडली या संदर्भात ओशिवरा पोलिसांकडून अधिक तपास सुरू
मुंबई-गोवा महामार्गा वर कशेडी जवळ येथे दरड कोसळली आहे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई कडून गोवा जाणारी वाहतूक प्रभावित झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या यंत्रणेकडून अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्यासाठी काम केले जात आहे. परिसरात पाऊस व वारा जोरदार आहे. सदर दरड चा काही भाग जवळ घरांच्या परिसरात आल्याने त्या परिसरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे
वरंधा घाटात दरडी कोसळल्यामुळे सध्या रस्ता रस्ता बंद आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसात वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डे हद्दीदरम्यान चार पाच ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर आल्या आहेत. सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरडी हटवण्याचे काम सुरु आहे.
रायगड जिल्हा मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातील बार्जेस वाहून आल्याने पुलाजवळ अडकल्या आहेत. पुलाला धोका असल्याने तात्पुरती मंडणगड - म्हाप्रळ गोरेगाव - माणगाव वाहतूक बंद केली आहे. सदर जागी पोलीस विभाग, महसूल , सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषद यांचे वतीने आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.
पेण -खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यातील कानसळ येथील अंबा नदीजवळ फसलेले 12 कामगार यांना बचाव करत सुखरूप बाहेर काढले आहे अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
खालापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी नाही
मुंबई- पुणे एक्सप्रेस वरील दोन्ही मार्गीकेवर वाहतूक कोंडी नाही
एक्सप्रेस वे सुरळीत सुरू
लोणावळा घाटात पडलेली दरड बाजूला करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत
लोणावळा येथील हुडको कॉलनीतील वेदांत अकॅडमी परिसरात पीएमआरडीएच्या पीडीआरएफ (PDRF) पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी व आवश्यक मदतकार्य सुरू केले आहे.
परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
नागोठणे शहरातील पूरस्थिती कायम
एसटी स्टँड, कोळीवाडा, बाजार पेठेच्या काही भागात अजूनही पाणी
अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
नागोठणे परिसरातील विजेचे खांब कोसळले
शहर आणि परिसरातील विद्युत पुरवठा खंडित, मोबाईल नेटवर्क देखील विस्कळीत
विजेअभावी नागोठणेकरांचे हाल
मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम
मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प.... वाकण, सुकेळी, खिंड परिसरात पाणी ओसरत नसल्याने वाहतुकीवर परिणाम
ट्रॅक, कार, बसेस वाहतूक कोंडीत अडकली
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड... मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे प्रवासात विघ्न... मागील 24 तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प...... मुंबईकडून कोकणात येणारी वाहने... जिंदाल कंपनी ते वाकण परिसरात उभी... तर कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहने जिंदाल कंपनी ते सुकेळी टोल नाका पर्यंत उभी
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये पावसाचे तांडव
उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी अनेक गावांचा संपर्क तुटला
अंबरनाथ-नाळिंबी रस्ता पाण्याखाली भिसोळ, नालिंबी गावांचा संपर्क तुटला
उल्हास नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत होणाऱ्या या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीने इशाऱ्याची पातळी ओलांडली आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
भिसोळ आणि नलींबी या गावांना अंबरनाथकडे जोडणारा मुख्य रस्ता आता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर नदीच्या पुराचे पाणी आल्याने नलिंबी आणि अंबरनाथ या गावांचा संपर्क तुटला आहे
मुंबई, ठाणे, रायगडसाठी भारतीय हवामान विभागाकडून आजसाठी रेड अलर्ट जारी
वाऱ्यांचा वेग ताशी ७०-८० किमी राहण्याचा इशारा
वाऱ्यांचा वेग अधिक राहणार असल्याने खबरदारी म्हणून ऑरेंज अलर्ट अपग्रेड करत रेड अलर्ट जारी
वाऱ्यांच्या वेगाने झाडं उन्मळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
सोबतच, मुंबईत काही काळ मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
दरम्यान, वाऱ्याचा वेग आज दिवसभर कायम राहण्याचा अंदाज
Mahabaleshwar Rain: महाबळेश्वर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोळशे नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे येरणे गावासह परिसरातील पाच गावांचा संपर्क तुटला असून स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एबीपी मझाकडे नागरिकांनी मोबाईलवर संवाद साधतांना मदतीची याचना केली आहे.
राज्यभरातील पूरपरिस्थिती बघता अनेक आमदार विधिमंडळ कामकाजाला वेळेत पोहचू शकणार नाही त्यामुळे आजचे कामकाज थकीत करावे किंवा काही वेळासाठी पुढे ढकलावे अशी मागणी भाजप आमदार समीर मेघे यांनी केली
अनेक विमानाची उड्डाणे रद्द झाल्याने व ट्रेन पण उशिरा सुटत असल्याने आमदारांना मुंबईला यायला अडचणी निर्माण होत असल्याचे समीर मेघे यांनी सांगितले
पिंपरी चिंचवड मध्ये पावसाचा हाहाकार, ताथवडे परिसरात घरांमध्ये पाणी
ताथवडे परिसरातील रघुनंदन मंगल कार्यालय जवळील मोरया कॉलनी मध्ये अनेक घरात पाणी शिरले
पावसाची रिपरिप सुरूच, पाण्याचा ओघ वाढत असल्याने नागरिक चिंतेत
संपूर्ण घरात पाणी, घरातील उंच वाट्यावर नागरिक बसून
सकाळी सहा वाजता घरात पाणी शिरलं पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण
मुंबई गोवा महामार्गवरील खवटी येथे दरड कोसळून महामार्ग ठप्प झालाय. रात्री दिढ च्या दरम्यान ही घटना घडली असून महामार्गाच्या लगत असलेल्या घराला ही दरड येऊन टेकली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली.
रायगडच्या खोपोली पेण महामार्ग पाण्याखाली...
सारसन ते इसांबा फाट्यावर पाणी आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
वाहतुकीसाठी रस्ता बंद
मुसळधार पावसामुळे खोपोली आणि पेण ला जोडणारे रस्ते पूर्णपणे बंद
पाताळगंगा आणि भोगावती नदी धोका पातळीच्या बाहेर
भिवंडी शहर व ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरुवात
भिवंडी शहरातील भाजी मार्केट बाजारपेठ परिसरात गुडघाभर पाणी साचले
परिसरात अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी
पावसाचा जोर कायम राहिल्यास परिसरात पाणी वाढण्याची शक्यता
कामवारी नदीचे पात्र वाढल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पाणी सिरण्यास सुरुवात
शहरातील सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात
भिवंडी शहर व ग्रामीण भागात सर्वच शाळांना सुट्टी
Satara Rains: सातारा जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून पश्चिम भाग अक्षरशः पावसाने झोडपून काढला आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 473 मिलिमीटर पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि वाई तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.दुसरीकडे, कोयना पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात जवळपास 78 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. कोयना येथे 257 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा 22.54 टीएमसीवर पोहोचला आहे.हवामान विभागाने पुढील काही दिवसही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदिया वनपरिक्षेत्रातील दासगाव बीट आणि मजीतपूर परिसरात गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीच्या धडकेत एका रानअस्वलाचा मृत्यू झाला.
वनविभाग कडून मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातून अधिवास बदलत असताना हे अस्वल रेल्वे रुळ ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या रेल्वेगाडीची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत अस्वलाचा ताबा घेण्यात आला..
मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी
मुंबई धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मागील 48 तासात आठ टक्के पाणीसाठा मध्ये वाढ झाली आहे
सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये १६. ९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे
ज्याप्रकारे सद्यस्थितीत पाऊस पडत असताना या पाणी साठ्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते
Mumbai Rains: मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी, मुंबई धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मागील 48 तासांत आठ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे
सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 16. 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
ज्याप्रकारे सद्यस्थितीत पाऊस पडत असताना या पाणी साठ्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
Nala Sopara Rain Updates: नालासोपारा : पावसाचा जोर कायम असल्याने वसई-विरारमधील परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या चारही प्लॅटफॉर्मवर पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सुरू आहे. मात्र, पाण्यामुळे लोकल गाड्या अतिशय मंदगतीने आणि विलंबाने धावत असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थितीवर रेल्वे प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रायगडच्या कर्जत मधील उल्हास नदीला पूर
उल्हास नदी किनाऱ्यावर असणाऱ्या बेंडसे आणि वावे पूल पाण्याखाली
पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला
उल्हास नदीवरील गावांना पुराचा फटका... बेंडसे गावात उल्हास नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने नुकसान
Khavati Rain Update: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ खवटी येथे मोठी दरड महामार्गावर कोसळली आहे. रात्री अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी जेसीबी आणि पोकलेन यांसारखी यंत्रसामग्री अपुरी पडत असल्याने महामार्ग वाहतुकीसाठी नेमका कधी खुला होईल, याबाबत अनिश्चितता आहे. या संपूर्ण परिस्थितीचा घटनास्थळावरून आढावा घेतला आहे.
Raigad Rain Updates: सावित्री नदीला आलेल्या पुराच पाणी महाड शहरात शिरले असून महाड शहरातील बाजार पेठ, सुकट गल्ली, दस्तुरी नाका, गांधारी नाका परिसरात पुराच पाणी साचलेले पहायला मिळत आहे.
Mumbai Rains: मुंबई डबेवाल्यांची सेवा आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. विरार-वसई परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक डबेवाल्यांच्या रूममध्ये पाणी शिरले असून काही रेल्वे स्थानकांवरही पाणी साचले आहे. जीविताला धोका टाळण्यासाठी संघटना अध्यक्ष उल्हासभाऊ मुके यांनी आजची सुट्टी जाहीर केली आहे. वेस्टर्न लाईनवरील लोकल ट्रेनही उशिराने धावत असल्याने प्रवाशांना अधिक गैरसोय होण्याची शक्यता आहे.
विरार रेल्वे स्थानकावर प्रवासी खोळंबले
बऱ्याच वेळापासून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा ठप्प
प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याने प्रवासी संभ्रमात
मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला मोठा फटका
रायगड - रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहराजवळून वाहणाऱ्या पुंडलिका नदीला पूर आलाय. त्यामुळे शहरांमध्ये पाणी शिरले. रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते बंद झाल्यामुळे अनेक नागरिक रात्रभर अडकून पडले आहेत. मुंबई किंवा कोकणाच्या दिशेने प्रवास करणे मुश्किल झाले आहे.
मुंबई - पुणे एक्स्प्रेसवे बंद
मुंबई - पुणे जुना हायवे बंद
मुंबई - गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद
रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद
रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद
रायगड - माणगाव-पाली मार्ग बंद
रायगड - माणगाव-पुणे ताम्हणी घाटमार्ग बंद
वसई : वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रिक्षा सेवा, राज्य परिवहन (एसटी) सेवा आणि वसई-विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.
विशेषतः नालासोपारा पश्चिम येथील एसटी डेपो परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एकही एसटी बस बाहेर पडू शकत नाही. डेपो परिसरासह वाहतूक नियंत्रण कक्षातही पाणी शिरल्याने एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, अत्यावश्यक कामांसाठीही प्रवास करणे कठीण झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाचा जोर कायम असून जुहू चौपाटी परिसरात सध्या मुसळधार पावसासह ताशी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत आहे. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की नागरिकांना उभं राहणंही कठीण होत असून अनेक जण वाऱ्याच्या जोराने पुढे ढकलले जात असल्याचं चित्र आहे. समुद्रही खवळलेला असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने जुहू चौपाटीवर नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तळकोकणात दमदार पाऊस झाल्याने बळीराजाने शेतीच्या कामांना वेग दिलाय. आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. जिल्हात कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे, गोठ्यांची पडझड होऊन लाखो रुपयांच नुकसान झाल आहे. हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केल्याने जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. समुद्र किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत आहेत,
अतिवृष्टीमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीला फटका
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी बंद
बोगदा क्रमांक २ च्या बाहेर पहाटे दरड कोसळली
पहाटे पासूनच मिसिंग लिंक वरून वाहतूक थांबवली
Palghar Rains: पालघर पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार पाऊस सुरू
पालघरच्या पालघर सातपाटी रोडवरील टेंभोडे येथे रोडवर पाणी भरल्याने वाहतूक बंद
सातारा जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून नुकतीच केलेली पेरणी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. मे महिन्यात आगाऊ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची उगवलेली पिकेही जलमय झाली असून पिके कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.
रायगडच्या खोपोली पेण महामार्ग पाण्याखाली...
सारसन ते इसांबा फाट्यावर पाणी आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
वाहतुकीसाठी रस्ता बंद
मुसळधार पावसामुळे खोपोली आणि पेण ला जोडणारे रस्ते पूर्णपणे बंद
पाताळगंगा आणि भोगावती नदी धोका पातळीच्या बाहेर
साताऱ्यातील फलटण- पुसेगाव रस्त्यावर ताथवडे घाटात डोंगरावरील दगड गाडीवर कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू
सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातही पावसामुळे घाटांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे...
देवदर्शनासाठी आलेल्या चारचाकीवर फलटण तालुक्यातील फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात कारवर दगड कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
योगेश पोपट जगताप रा. आंबे खुर्द, बारामती असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. या भागात पडत असलेल्या
मुसळधार पावसामुळे ताथवडे घाटात डोंगरावर सैल झालेला दगड वाहनाच्या काचेवर कोसळला. आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दिशादर्शक फलकावर आदळले.. याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे... ठाणे शहरात रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे...
पावसाचा जोर रात्रीपेक्षा कमी झाला आहे त्यामुळे काही सखल भागातील पाण्याचा निचरा झाला आहे... तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाड पडल्याच पाहायला मिळत आहे...
Lonavala Rain Update LIVE: पर्यटन नगरी लोणावळ्यात तुफान पाऊस बरसलाय. अवघ्या नऊ तासांत तब्बल 105 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. सकाळी 8 पासून पावसाने जोर धरला अन संध्याकाळी पाच पर्यंत या मोसमातील विक्रमी नोंद केली. हवामान विभागाने दिलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय. विक एंडला पावसाने कृपादृष्टी कायम ठेवल्यानं पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यामुळं पर्यटनावर अवलंबून असलेला व्यापारी वर्ग सुखावलाय. लोणावळा आणि परिसरात आत्तापर्यंत 928 मिलिमीटर पाऊस बरसलाय. या पावसाने शेतकरी वर्ग ही पेरणीच्या कामाला लागलाय. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2290 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. ही तुलना करता पावसाने आणखी कृपादृष्टी दाखवावी अशी अपेक्षा लोणावळाकरांना लागून आहे.
Pune Rain Update: पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रात तुफान पाऊस बरसतोय. गेल्या 24 तासांत धरण साठ्यात थेट पाच टक्क्यांनी वाढ झालीये. काल दिवसभरात 96 मिलिमीटर इतका पाऊस कोसळला. धरण क्षेत्रात आत्ता पर्यंत अवघे 440 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. त्यामुळं धरणात ही केवळ 23.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणात 71.48 टक्के इतका पाणी साठा होता. त्यामुळं पावसाने आणखी जोमाने कृपादृष्टी दाखवावी, अशी अपेक्षा मावळातील शेतकऱ्यांना आणि पिंपरी चिंचवड शहरवासीयांना आहे.
Lonavala Rain Update: मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहराला अक्षरशः जलमय स्वरूप आले. शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. नांगरगाव, भांगरवाडी, तुंगारली, रायवूड, दामोदर कॉलनी, वर्धमान सोसायटी ईतर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही मार्गावर अडीच ते तीन फूट पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. शहरातील वाढते बांधकाम, नदी-नाल्यांवरील अतिक्रमण आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Raigad Rains: रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच आहे.. मुसळधार पावसाचा फटका दक्षिण रायगड मधील महाड शहराला बसलाय. कारण महाड शहराच्या बाजूने वाहणारी सावित्री नदीने धोका पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केल आहे. सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा महाड शहरासह आजूबाजूच्या शेतीला बसला असून महाड शहरातील अनेक बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.
Thane Rain Updates: ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे शहरात रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर रात्रीपेक्षा कमी झाला आहे त्यामुळे काही सखल भागातील पाण्याचा निचरा झाला आहे... तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाड पडल्याच पाहायला मिळत आहे.
Mumbai-Goa Highway Rain Updates: मुंबई गोवा महामार्गावर आणखी एका ठिकाणी दरड रस्त्यावर यायला सुरुवात. परशुराम घाटाच्या जवळ असलेल्या ओमेगा हॉटेलच्या शेजारी डोंगरातील माती महामार्गावर यायला सुरुवात. मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक तात्काळ बंद करण्याची गरज. डोंगराच्या वरच्या बाजूला मोठे दगड...
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसासोबतच जोरदार वारेही वाहत असल्याने जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पाऊस आणि वेगवान वाऱ्यांच्या दुहेरी तडाख्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, तसेच झाडांच्या आणि जीर्ण संरचनांच्या परिसरात उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोमवार असल्याने आज आठवड्याचा पहिला कामाचा दिवस आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून नागरिकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचा आढावा घेतला आहे
Nala Sopara Rain Updates: नालासोपारा : नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमरेभर पाणी साचल्याने चाकरमानी जीव धोक्यात घालून रेल्वे स्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
दरम्यान, परिसरातील एक भलेमोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, होर्डिंग कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Vasai-Virar Rain Updates: वसई : वसई-विरार शहरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून, ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही पाणी साचत नव्हते त्या भागांमध्येही गुडघाभर पाणी साचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पहाटेपासून शहरातील रिक्षा सेवा जवळपास ठप्प असून अनेक रिक्षाचालकांनी वाहने बाहेर काढलेली नाहीत. काही भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
Vasai-Virar Rain Updates: वसई : वसई-विरार शहरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून, ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही पाणी साचत नव्हते त्या भागांमध्येही गुडघाभर पाणी साचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पहाटेपासून शहरातील रिक्षा सेवा जवळपास ठप्प असून अनेक रिक्षाचालकांनी वाहने बाहेर काढलेली नाहीत. काही भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
Mumbai Rains: मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसासोबतच जोरदार वारेही वाहत असल्याने जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पाऊस आणि वेगवान वाऱ्यांच्या दुहेरी तडाख्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, तसेच झाडांच्या आणि जीर्ण संरचनांच्या परिसरात उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोमवार असल्याने आज आठवड्याचा पहिला कामाचा दिवस आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून नागरिकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Local Train Updates: मुंबईत पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुंबईला रात्रभर पावसानं झोडपून काढलं. त्यानंतर आता मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल रेल्वेवरही मुसळधार पावसाचा परिणाम झालाय. मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतेय. तर, पश्चिम रेल्वे वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावतेय. तर, हार्बर लाईनसुद्धा 10 मिनिटं उशिरानं धावतेय.
Pune Rains : मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO), पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील 5व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली 30 सदस्यांचे (1 अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी व 27 जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी 5.50 वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.
Raigad News: रायगडच्या नागोठणे शहरात शिरले पुराचे पाणी
अंबा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचे नागोठणे शहरात रौद्र रूप
नागोठणे बाजरपेठ, ST स्टँड परिसर, कोळीवाड्यात पुराचे पाणी
नागोठणे शहरातील रस्तावर तीन ते चार फुट पाण्याची पातळी
नागोठणे शहरात अंबा नदीने धारण केलं आहे रौद्ररूप...
सकाळपासून नागोठणे शहर पुराच्या पाण्याखाली
एसटी बस सेवा ठप्प.... नागरिकांना बचाव टीम कडून सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू.... बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली
Chiplun, Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेड शहरातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी नदीही धोकादायक पातळीच्या दिशेने प्रवास करत असून बाजार पुलाला नदीच्या पाण्याचा स्पर्श झाला आहे. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठावरील नागरिक आणि व्यापाऱ्यांना सुरक्षिततेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास चिपळूण शहरातही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Rains: मुंबई मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने (IMD) आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सखल भागांमध्ये पाणी साचण्याची, वाहतूक कोंडी होण्याची तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mankhurd Chawl Collapse: मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात आज रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 8.30 वाजता अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जावून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार श्री. अबू असीम आझमी, श्रीमती रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Rain LIVE: मुंबईत पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; तर पुढील दोन दिवसांत विदर्भात पावसाचा जोर वाढणार