Maharashtra Rain Update :राज्यभरात पावसाचा जोर (Rain Updates)कायमअसल्याचेचित्रआहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्याअंदाजानुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. विशेषतः मुंबईतील (Mumbai Rain Updates) काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, अवघ्या 24 तासांत 200 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय , पुढील 72 तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज आहे.

Continues below advertisement

दरम्यान, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पाणी साचणारे आणि सखल भाग, समुद्रकिनारे तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटावर या पावसामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षाय.

Mumbai Rain : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी

Continues below advertisement

मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळत असून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आकाश ढगाळ आहे. हवामान विभागाने मुंबईत पुढील काही तासांतही मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे, मुंबईसह पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस असल्यामुळे उपनगरात काही सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. असंच जोरदार पाऊस सुरू राहिला तर सकाळच्यावेळी मोठा संख्यामध्ये मुंबईकर चाकरमानी कामासाठी निघणार आहे. या पावसाच्या फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट, ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार

मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट देण्यातआलाअसूनठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यातआलाआहे. तर राज्यातील इतर भागातही 7 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचीशक्यताआहे.

2-3जुलै दरम्यान झालेली पावसाची नोंद: (सकाळी 5 ते सकाळी 6)

मलबार हिल: 146 मिमी

फोर्ट: 139 मिमी

अंधेरी: 136 मिमी

वर्सोवा: 129 मिमी

पवई: 124 मिमी

मानखुर्द: 118 मिमी

भांडुप: 116 मिमी

मुलुंड: 115मिमी

इतर महत्वाच्या बातम्या