Maharashtra Rain Update : राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, कोकण आणिविदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रासाठी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचे असतील, असे कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने सांगीतलय. तसचं अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवलाय.
सप्टेंबर मध्यानंतर राज्यासह देशभरातून मान्सून प्रामुख्यानं माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्यानं राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी, 64 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या चारही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधारेचा अंदाज
मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, नाशिक, साताऱ्यातील घाट माथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज आहे.तर सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यात धरणं 100 टक्के भरली
परतण्यापूर्वी पावसानं राज्यभरात धुवांधार बँटिंग सुरु केली आहे. अशातच यंदा झालेल्या पावसामुळं मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणं तुडुंब भरली आहेत.