Maharashtra Rain : राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभागानं पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात जरी चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पाहुयात हवामान विभागाचा अंदाज...
आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान, काही भागात या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटकाही बसला आहे. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून देखील गेल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पावसाची गरज आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात शेती कामांना वेग
राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्या भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तिथं शेती कामांना वेग आला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही, त्याठिकाणी धरणांच्या, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. काही भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तिथं धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाने गाठला तळ
नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भाग आजही दमदार पावसाची (Rain Update) वाट पाहत आहे. पावसाचे दोन महिने उलटले असले तरीही अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक धरणांची पाणी पातळी जैसे थे आहे. अशातच मनमाड परिसरात देखील पावसाने पाठ फिरवली असल्याने वाघदर्डी धरण साठ्यात कमालीची घट होऊन धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे मनमाडकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी मनमाड जशी उन्हाळ्यात परिस्थिती असते, तशीच काहीशी परिस्थिती भर पावसाळ्यात ओढावल्याचे चित्र आहे. तब्बल 22 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.
महत्त्वाच्या बातम्या: