Maharashtra Rain News Update : पुणेजिल्ह्यासह घाटमाथापरिसरातसध्यातुफानपाऊसबरसतआहे. परिणामी, पुणे, सोलापूरसाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण वजापातळीतून (मायनसमधून) प्लसमध्ये आल्याचेदिलासादायकचित्रसमोरआलं आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावरती झाल्याने मुसळधार पावसामुळे उजनी धरणात या दोन दिवसात पाण्याचा मोठा विसर्ग आलाय. ज्यामुळे वजा 15 टीएमसी असलेलं उजनी धरण आता प्लस झालं आहे. (Maharashtra Rain News)
दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आलं आहे. सध्या उजनी धरणात 66 पूर्णांक 28 टीएमसी पाणीसाठा झालाय. 63.25 टीएमसीच्या वरती पाणी आलं की धरण प्लसमध्ये येतो. यासोबतच उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून 1 लाख 17 हजार 263 क्युसेकने पाण्याची येणारी आवक सुरू असल्याने भीमा नदीपात्रात पाण्याचा मोठा प्रवाह येत आहे. परिणामी भीमा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
Raigad Rain News : मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 28 धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ, 17 धरणे 100 टक्के भरली
दुसरीकडे रायगड जिल्ह्यात मागील 6 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांसह धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय.जिल्ह्यातील प्रमुख 28 धरणांतील पाणीसाठा सद्यस्थितीमध्ये 84.37 टक्क्यांवर पोहोचला असून फणसाड, वावा,सुतार वाडी, डोनवत कालोते मोकाशी,आंबेघर ,कोंडगाव, घोटवडे, कव्हेळे, उन्हेरे,पाभरे,संदेरी, वरंध, खिंड वाडी,कोथुर्डे, खैरे, भिलवले आणि मोरबे हे 17 धरण 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे रायगडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी उर्वरित धरणांमध्ये देखील पाण्याची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात आज देखील रेड अलर्ट दिला असून नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.
Marathwada Rain News : मराठवाड्यात मान्सूनचीपाठ, खरीप हंगाम संकटात
मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोरआलीआहे. मराठवाड्यातीलबहुतांशजिल्ह्यात पाऊस लांबलाय आणि त्याचा थेट फटका आता खरीप हंगामाला बसताना दिसतोय. मराठवाड्यात यंदा पावसाची 13 टक्के तूट नोंदवली गेली आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 17 लाख 87 हजार हेक्टरने पेरणी घटली आहे. संपूर्ण विभागात केवळ 58 टक्के पेरणी झाली असून, अनेक शेतकरी अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. कृषी विभागानेही पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करू नका, असा सल्ला दिलाय. कारण पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात मान्सूनने अपेक्षित गती घेतलेली नाही. जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यात आतापर्यंत 24 लाख 55 हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 42 लाख 42 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. म्हणजेच यंदा 17 लाख 87 हजार हेक्टरने पेरणी कमी झाली आहे. यातछत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता जाणवत आहे. विभागात सरासरी केवळ 58 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचं आवाहन केलं आहे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागानेही पुढील काही दिवस पावसात खंड पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगामाचं भवितव्य आता पुढील पावसावरच अवलंबून असणार आहे.
Marathwada Rain Update : मराठवाड्याचं लक्ष लागून असलेल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु
अशातच, मराठवाड्याचं लक्ष लागून असलेल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाली आहे. गेल्या 24 तासांत धरणात तब्बल 1 हजार 493 क्युसेक वेगाने पाणी दाखल होतेय. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा आता 28. 24 टक्क्यांवर पोहोचलाय. मात्र, दिलासादायक आवक सुरू असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाणी कमीच आहे. कारण याच दिवशी गेल्या वर्षी जायकवाडीत 49 पूर्णांक 65 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे अजूनही मराठवाड्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी 17.87 लाख हेक्टरने घटली
विभागात केवळ 58% पेरणी पूर्ण
24.55 लाख हेक्टरवरच पेरणी
पुरेशी ओल झाल्यावरच पेरणी करा, कृषी विभागाचा सल्ला
पुढील काही दिवस पावसात खंड पडण्याची शक्यता
शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे
Alandi Flood News: आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; खडकवासला धरण शंभर टक्के भरले
अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर (Alandi Flood News) आला आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळं अनेक भागात पुराचं पाणी शिरलं होतं. त्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे, पुण्यातील खडकवासला धरण शंभर टक्के भरले असुन धरणातून बावीस हजार आठशे ऐंशी क्सुसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदी पात्रातील रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. भिडे पुल मेट्रोच्या कामांसाठी आधीच वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतुककोंडी होऊ शकते. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये मिळून 14 टी एम सी म्हणजे 48 टक्के इतका पाणीसाठा जमा झालाय.
