Maharashtra Rain :  राज्यातील काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी आला आहे. मात्र, राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही असे खुळे म्हणाले. दरम्यान, राज्यात कोण कोणत्या तारखांना पाऊस पडणार आहे, याबाबतची माहिती डखांनी दिली आहे.

या तारखांना पडणार जोरदार पाऊस

यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही. कारण की आतापर्यंत 350 मिलमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर 7, 8 जूनला देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 13 ते 17 चा देखील खूप पाऊस पडणार आहे‌. म्हणून राज्यामध्ये पेरणीसाठी असं पोषक वातावरण आहे. जमिनीमध्ये ओल खूप गेली आहे, सर्व शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वत: घ्यावा अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. 

13 जून ते 18 जून राज्यात मोठा पाऊस होणार, वडे, नाले वाहणार

राज्यामध्ये 7, 8, 9 जूनला पाऊस येणार आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेत तयार करुन घ्या. कारण 7 जून ते 10 जूनच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि जर 7, 8, 9, 10 जून पर्यंत नाही झाले तर 12 जून पर्यंत शेतीची कामे करुन घ्या. कारण 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी वडे, नाले वाहतील असा पाऊस पडणार असल्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिली आहे.  

या भागात पडणार जोरदार पाऊस

राज्यात 13 जून ते 18 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, नगर या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. 13 जून ते 18 जून च्या दरम्यान लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगुळा तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ सांगायचं झालं तर सर्व जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Mumbai Rain : मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, वरळी मेट्रो स्थानकावर गळती सुरू, अंधेरी सबवे पाण्याखाली